मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखेची 'सेनापति बापट वक्तृत्व स्पर्धा पावनखिंड चित्रपट कलाकाराचे उपस्थितीने विद्यार्थी उत्साहित!
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय नायगाव शाखेची सेनापती बापट वकृत्व स्पर्धा
पावन खिंड चित्रपट कलाकराचे उपस्थितीने विद्यार्थी उत्साहित
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय" या मुंबईतील प्रतिष्ठित संस्थेच्या नायगाव शाखेच्या वतीने 'सेनापती बापट वक्तृत्व स्पर्धेचे' दि. 20 फेब्रुवारी रोजी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
ही स्पर्धा पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्ग निहाय पाच गटात घेण्यात आली
पंचवीस शाळांतील 150 विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला.
गेली दोन वर्षें कोविड संबंधित बंधनांमुळे विद्यार्थ्यांतील कलागुण दर्शनाला वाव नव्हता आता हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाल्याने त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.
आहेपालकांचा व मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व उत्साह पाहता आणि स्पर्धेत भाग घेणारी विद्यार्थी संख्या अधिक असल्यामुळे स्पर्धा २ सभागृहामध्ये घेण्यात आल्याचे कार्यवाह अमेय कोंडविलकर यांनी सांगितले
महाराष्ट्रभर चित्रपटगृहांतून लोकप्रियतेची शिखरं सर करत असलेल्या "पावनखिंड" या ऐतिहासिक चित्रपटातील यशस्वी कलाकार चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, विक्रम गायकवाड यांची या प्रसंगी उपस्थिती आणि त्यांनी सर्व स्पर्धकांना दिलेल्या शुभेच्छामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले. हे सांगताना आयोजकापैकी एक असलेले कार्यवाह मकरंद केसरकर यानी सांगितले की,उल्लेखनीय बाब अशी की आपले आवडते कलाकार समोर असुनही एकाही विद्यार्थ्याने आपली जागा सोडली नाही यातूनच त्यांच्या शिस्तीचे दर्शन पाहुण्यानाही झाले!
ग्रंथसंग्रहालयच्या नायगाव शाखेचा ७१वा वर्धापनदिन २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनी साजरा होणार असून. त्या निमित्ताने आयोजित स्नेहसंमेलनात स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडेल अशी माहिती अध्यक्ष हेमंत दळवी यांनी दिली.
ब्युरो रिपोर्ट
जनहित न्युज महाराष्ट्र
मुंबई
_____________जाहिराती साठी संपर्क___________
बातमी आणि जाहिराती साठी संपर्क साधा
संपादक हरी आल्हाट 9960504729
__________________________________________
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद