महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखेकडून दिनांक १७ मार्च २०२२ रोज गुरुवारी ढोणे गाव दत्तगुरु मठ, वांगणी येथे एन एस एस च्या विद्यार्थी कॅम्प मध्ये होळी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,* कल्याण शाखेकडून दिनांक १७ मार्च २०२२ रोज गुरुवारी  ढोणे गाव दत्तगुरु मठ, वांगणी येथे एन एस एस च्या विद्यार्थी कॅम्प मध्ये होळी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन
 या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.जाबिर सर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात अंनिस कार्यकर्त्यांनचे स्वागत एन. एस. एस. विद्यार्थ्यांच्या हस्ते तुळशीचे वृक्ष देऊन करण्यात आले. औपचारिक कार्यक्रम संपल्या नंतर कार्यक्रमाची सुरुवात . डॉ. आशिष ठक्कर यांनी आरोग्य संवर्धन कसे राखावे, आपल्या शरीराला कोणत्या आहाराची गरज आहे, ते कोणत्या अन्न घटकातून मिळते याची सखोल माहिती दिली. 
ज्या सणाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या होळी सणाचे महत्त्व,"पर्यावरण पूरक होळी पर्यावरण संरक्षण संकल्प" या विषयावर. बबन नागले अंनिस, कल्याण यांचे व्याख्यान झाले. त्यात त्यांनी पर्यावरण पूरक होळी या विषयावर बोलताना  वाढते प्रदूषण, जंगलांचा होत असलेला प्रचंड ऱ्हास याविषयी माहिती देत, पर्यावरण पूरक उत्सवाची आवश्यकता विशद केली. उत्सव साजरे करतांना अनेक  कालबाह्य परंपरा चिकटून न राहता, त्यांची चिकित्सा करून, पर्यावरण पूरक नवीन बाबींचा समावेश करत आज सण-उत्सव साजरे करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच "झाडे लावा व झाडे जगवा" असा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या रंग पंचमी कशी साजरी करावी, कोणत्या रंगांचा वापर करावा.रंग न वापरता रंग ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्याचे आव्हान केले. संवादात्मक झालेल्या व्याख्यानात त्यांनी उपस्थितांना सामूहिकरीत्या पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा सुद्धा दिली. सोबतच समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा, समज गैरसमज त्या मागील अंधश्रद्धा,व त्या मागील काही चमत्कार करून दाखविली.
नंतर ज्या क्षणाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते ते अंनिस कार्यकर्ते आयु.राजू कोळी कार्यक्रम सादरीकरण करण्यास उभे राहिले त्याच क्षणी टाळ्यांच्या गजराने संपूर्ण आसमंत संगीतमय झाले. त्यांनी आपल्या चमत्कारिक अदाकारीने एक एक पंच घेत कधी हसता हसता संपूर्ण विद्यार्थी रडायला लागलेत व पुन्हा रडता रडता हसायला लागले.अशी त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात नजर बंदी पासून सुरू झाली ती गाणे गात चमत्कार दाखवीत प्रबोधन करण्यात आले
कार्यक्रमात सुमारे ५० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
                             ब्युरो रिपोर्ट
                     जनहित न्युज महाराष्ट्र
                              वांगणी 
-------------------------------------------------------------------
      बातमी आणि जाहिराती साठी
             संपर्क 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा