महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे यांनी केली मागणी

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे यांनी केली मागणी.    उस्मानाबाद
शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महावितरण कंपनीकडून विजेचे खांब तारा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले व होत असल्याने महावितरणने शेतकर्‍यांना भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिनांक 25 मार्च 2022 रोजी निवेदन पत्राद्वारे केली असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महावितरण कंपनी कडून करण्यात येणार्‍या वीज पुरवठा चे विद्युत खांब पोल तारा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी जागा वापरली आहे परंतु या जागेपोटी बहुतांशी शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही काही शेतकऱ्यांना तर नुकसान भरपाई मिळते हे माहिती देखील नाही ? तर भारतीय टेलिग्राफ कायदा 1985 च्या कलम 16 नुसार वापरासाठी घेतलेल्या जमिनीचे भाडे नुकसान भरपाईची परिगणना करून व त्यावरील नियमाप्रमाणे व्याज आकारून संपूर्ण रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली आहे परंतु या कायद्यान्वये नुकसान भरपाई देण्यात येत नाही उलट अशा कामासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना वीज देखील व्यवस्थित पुरविली जात नाही उलट अनेक वेळा विद्युत कनेक्शन तोडून अन्याय केला जातो त्यामुळे या कायद्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे तसेच शासनाने संबंधितांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अरुण निटुरे यांनी दिला आहे अशी माहिती राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण नीटूरे यांनी दिली आहे.   
      
 ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उस्मानाबाद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार