लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे उल्हासनगर प्रतिनिधी पत्रकार सुशील पगारे यांचा प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन चंद्रमणी बुद्ध विहार उल्हासनगर न.4 येथे करण्यात आले होते.
लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे उल्हासनगर प्रतिनिधी पत्रकार सुशील पगारे यांचा प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन चंद्रमणी बुद्ध विहार उल्हासनगर न.4 येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश सावंत म्हणाले की, सुशील पगारे हे रेल्वेत अधिकारी होते. रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंबेडकरी चळवळीत फार मोठे योगदान आहे. पगारे हे फोटोग्राफर होते. त्यांच्याकडे दुर्मिळ फोटोचा साठा होता. प्रा. डॉ विठ्ठल शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, पगारे हे खऱ्या अर्थाने पॅन्थर चळवळ जगले आहेत. ते पत्रकार म्हणून कलाकारांच्या मुलाखती घेत आसत. गायक कृष्णा शिंदे यांची घेतलेली मुलाखत मला आठवते.
श्रद्धांजली सभेत रिपब्लिकन कामगार नेते प्रकाश पगारे, कवी लक्ष्मण अभंगे, लॉर्ड बुध्दाचे प्रतिनिधी विवेक जगताप, लेखक शांताराम निकम, समाजसेवक अशोक निकम, अनंत वाघमारे, आत्माराम वाघमारे, यूनियन प्रतिनिधी हेमंत जाधव, मोटारमन राजेश जाधव, बर्वे काका, आदर्श विकास मंडळाचे निकुंभ, समाजसेवक अरुण घोडेराव, जे एम कोमटे, सो. न. बरसे, गायक निवृत्ती संसारे, मुंबईचे आत्माराम वाघमारे, समाजसेविका लता पडघान, रेखा उबाळे, ऍड. मनीषा झेंडे, अर्चना येलवे, सिंग मॅडम, सामाजिक कार्येकर्ते दिनकर पवार, चिंतामण पवार, राजेश अहिरे, प्रकाश संसारे, विनय अहिरे, बी आर अहिरे आदींनी कालकथित सुशील पगारे यांना श्रद्धांजली वाहिली.
प्रारंभी बौद्ध भन्ते यांचे धम्म प्रवचन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल हंडोरे यांनी केले. सचिन पगारे यांनी प्रमुख अतिथी आणि सर्व नातेवाईक, कार्यकर्ते यांचे आभार मानले.
अशी माहिती राहुल हांडोरे यांनी दिली
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद