नाटककार प्रेमानंद गजबी यांचा अमृत महोत्सव सोहळा आचार्य अत्रे रंग मंदिर कल्याण मध्ये संपन्न

नाटककार प्रेमानंद गजबी यांचा अमृत महोत्सव सोहळा आचार्य अत्रे रंग मंदिर कल्याण मध्ये संपन्न
बोधी नाट्यपरिषद व प्रेमानंद गजबी अमृत महोत्सव समिती कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नाटककार प्रेमानंद गजबी यांचा अमृत मोहोत्सव सोहळा २५ जून २०२२ रोजी भव्य दिव्य प्रमाणात उत्साहत संपन्न झाला.
या प्रसंगी समग्र गजबी सान्सकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रा. डॉ प्रदीप सरवदे यांनी प्रस्तविक केले तर विद्या बाळादकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रेमानंद गजबे लिखित नाटक एकांकिका मधील नाट्य प्रवेश तन माजोरी, कुणाचे ओझे, महा ब्राम्हण व हवे पंख नवे या नाटकाचे नाट्य प्रवेश सादर झाले.
मद्यन्तरा नंतर नाटककार प्रेमानंद गजबी यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. नाट्यकर्मि शिवाजी शिंदे, रविंद्र सावंत व कल्याण मधील नाट्यकर्मि यांच्या हस्ते प्रेमानंद गजबी यांचा सत्कार करण्यात आला. बोधी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अशोक हंडोरे यांनी सत्कार मूर्तिचा परिचय करून दिला. लोकनेते सुरेश सावंत तसेच सहेली मिड टाऊन व डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान तर्फे करुणा कातखडे, सुजाता सावंत, सुनीता खैरनार, राहुल हंडोरे आदींनी नाटककार प्रेमानंद गजबी व त्यांच्या पत्नीचा सत्कार केला.
प्रेमानंद गजबी लिखित कविताचे सादरीकरण करण्यात आले. प्रा. एकनाथ जाधव, प्रा. डॉ. अलका पवार, प्रा. डॉ प्रदीप सरवदे, आनंद जाधव, रवी सावंत, सुरेश पवार, संबोधी बाळदकर, चेतन पवार, सुरेखा गावांदे, यांनी कविता सादर केल्या. प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे यांनी कविता सादरीकरण करण्याचे संयोजन केले होते तर  आनंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
शेवटी संगीतकार दत्ता जाधव यांनी संगीतबद्ध केलेले गाणी गायक रवींद्र बागुल, गौतम सोनवणे, पूनम गाढे, निलीमा सूर्यवंशी, तुषार पाटील, डॉ हर्षद गवई यांनी गजबी लिखित गाणी सादर केली. बोधी नाट्य परिषदेचे  सचिव राज बाळदकर यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाला नाट्य, साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
__________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा
संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार