जो_मागेल_त्याला_ध्वज. या संकल्पनेनुसार तिरंगा ध्वज वाटप अभियान

माझा देश,माझा तिरंगा आपला प्रभाग, तिरंगामय प्रभाग          
             जो_मागेल_त्याला_ध्वज.                           या संकल्पनेनुसार तिरंगा ध्वज वाटप अभियान 
उल्हासनगर प्रतिनिधी 
भारताच्या ७५ वा स्वातंत्र्या दिन अमृतमहो्त्सवा निमित्त  घरोघरी तिरंगा..हर घर तिरंगा* 
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार 
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व 
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली देशभावना व देशाभिमान प्रफुल्लित करणे करिता
 मागेल_त्याला_तिरंगा_ध्वज. हि संकल्पना अंबरनाथ चे नगरसेवक सुभाष साळुंके, यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.
ह्या अभियानाची सुरुवात दिनांक ११ अगस्ट २०२२ रोजी.अंध विद्यार्थ्यांच्या NAB- आयडीबीआय पॉलीटेक्निक अंबरनाथ येथे तिरंगा ध्वजाचे वाटप करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक संतोष कोळेकर व संवाद फाउंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके, जॉगर्स क्लबचे सदस्य राजकुमार जमखंडीकर, सार्थक व मानसी साळुंके, सुमित बनसोडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच शहरातील  शाळा, विद्यार्थी अधिकारी  व मान्यवर यांना तिरंगा ध्वज भेट देऊन १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज संहितेचे पालन करून तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन करण्यात आले .
आमा चे अध्यक्ष श्री उमेश तायडे, एमआयडीसीचे उपअभियंता  सुधीर अंबुरे, यांची भेट घेऊन तिरंगा ध्वज बहाल करण्यात आला.
प्रभागातील नागरिक तसेच  राष्ट्रप्रेमी नागरिक,शाळा,संस्था, गृहनिर्माण सोसायटी,मंडळे यांनी  तिरंगा ध्वजाबाबत मागणी केलेली आहे अशा नागरिकांना 
दि. १२ऑगस्ट २०२२ रोजी
सुभाष साळुंके यांचे शिव संवाद जनसंपर्क कार्यालय,साकेत बिल्डिंग, रोटरी क्लब हॉल समोर, वडवली विभाग, अंबरनाथ - पूर्व या ठिकाणी तिरंगा ध्वज वाटपकरण्यात येणारं असल्याची माहिती नगरसेवक सुभाष साळुंके यांनी दिली आहे 
 ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ
__________________________________________बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधावा ९९६०५०४७२९
__________________________________________
रब्बर स्टेंप, आय डी कार्ड ( ओळख पत्र )          अल्प दरात बनवून मिळतील संपर्क
८८३०६३१४०६
__________________________________________
न्यूज चॅनेल व पेपर मध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार