महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कामगार यांना मिळणार मालकी हक्काचं घर..उ म पा आयुक्त यांनी दीले आश्वासन
महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कामगार यांना मिळणार हक्काचं घर..उ म पा आयुक्त यांनी दीले आश्वासन
उल्हासनगर प्रतिनिधी.
दिनांक १७/०८/२०२२ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांच्या हक्काच्या घराबाबत प्रलंबित असलेले प्रकरण घेऊन हरि चंदर आल्हाट यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे यांना निवेदन देण्यात आले होते
त्या निवेदनाची दखल घेऊन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे कोकण विभागीय अध्यक्ष नितीन साळवे कोकण विभागीय सचिव आनंद भाऊ गांगुर्डे व हरि चंदर आल्हाट तसेच त्यांचे सहकारी यांनी उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त अजीज शेख यांना उल्हासनगर महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कर्मचारी यांना हक्काची घरे देण्यात यावी असे लेखी पत्र देवून विनंती केली असता तत्काळ आयुक्त साहेब यांनी उप आयुक्त व संबधित अधिकारी यांना आदेश दिलें की लवकरात लवकर सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आदेश देण्यात आले.
मागील ३७ वर्षा पासून महानगर पालिका वसाहती मध्ये आपल्या परिवारा सोबत राहतं असलेले हरी चंदर आल्हाट मागील १२ वर्षा पासून सफाई कामगारांना हक्काची घरे मिळावी या साठी मागणी करीत होते. सन २०१२ साली सफाई कामगार यांना भाडे तत्वावर देण्यात आलेल्या इमारती धोकादायक घोषित करून निष्कासीत करण्यात आल्या होत्या त्या वेळी इमारती मध्ये राहत असलेल्या ६४ कर्मचाऱ्यांना आवास योजना अंतर्गत मालकी हक्काचे घरे देण्यात येतील असे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांनी सुचित करून मोडकळीस आलेल्या इमारती निष्काशीत करून त्याच ठिकाणी नव्याने योजनेअंतर्गत इमारती बांधल्या व त्या इमारतीमध्ये श्रम साफल्य योजनेच्या अंतर्गत विज मीटर सुद्धा बसविण्यात आले आहेत सन २०१६/१७ साली म न पा आयुक्त निंबाळकर साहेब यांच्या कारकिर्दीत जुन्या इमारती मधील सफाई कर्मचारी यांच्या सोबत हरी चंदर आल्हाट यांनी आयुक्त निंबाळकर साहेब यांना भेट देवून सफाई कामगार यांच्या मालकी हक्काच्या घरासाठी मागणी केली असता आयुक्त निंबाळकर साहेब यांनी माहिती दिली की योजनांची निधी आली होती ती निधी महानगर पालिका ने परत केली असल्या मुळे योजनेची दुसरी निधी मिळे पर्यंत सफाई कामगारांना अल्प प्रमाणात रुपये १७०० से ते २१०० तसेच मेंटेनन्स चे अतिरिक्त १२० रुपये अशा प्रकारे भाडे तत्वावर देण्यात येतील अशी माहिती दिली व सफाई कामगार यांना आश्वासन दिले की लवकरच योजनेची निधी मागवून घेवून सफाई कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न सोडवू , असे आश्वासन देवून लॉटरी पद्धतीने घराच्या चावी वाटप करण्यात आल्या होत्या, त्या नंतर काही काळातच निंबाळकर साहेब यांची बद्दली झाल्या मुळे पुन्हा वसाहती मध्ये राहत असलेल्या कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागले , अचानक म न पा ने वसाहती मध्ये राहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मिळणाऱ्या मासिक वेतनातून पूर्ण HRA कपात करणे सुरू केले , जे बेसिक प्रमाणे अंदाजे रुपये ४८०० पासून ७८०० पर्यंत कपाती सुरू झाल्या त्या मुळे सफाई कामगारांना आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे व मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे त्रासदायक झाले असून, त्यातच उल्हासनगर महानगरपालिका ने ह्या इमारती दुरुस्ती करण्यासाठी एकही रुपया खर्च केलेला नाही, सफाई कामगारांच्या वसाहतीमध्ये, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या लावण्यात आलेल्या आहेत परंतु, पाण्याच्या मोटरी बंद आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तीन पैकी फक्त एका इमारती मध्ये लिफ्ट बसवून दिली आहे ती सुद्धा बंद पडली आहे,कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, भरमसाठ HRA कपात होत असल्याने अनेक कामगारांचे विज बिल थकले आहे, या सर्व कामगारांच्या समस्या म न पा आयुक्त अजिज शेख यांच्या समोर मांडल्या असता, म न पा आयुक्त अजीज शेख यांनी उप आयुक्त यांना आदेश दिलें की लवकरात लवकर पाठ पुरावा करून सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्यात यावे असे आदेश दिलें,
उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त अजीज शेख व उप आयुक्त जमीर लेंगरेकर साहेब तसेच संबधित अधिकारी यांनी १२८ सफाई कामगार यांच्या कुटुंबाला अखेर न्याय दिला व वारसपाठ पुरावा करून सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिल्या बद्दल केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे, हरी चंदर आल्हाट, नितीन साळवे, आनंद भाऊ गांगुर्डे यांनी संघटने तर्फे म न पा आयुक्त अजीज शेख यांचे आभार व्यक्त केले
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर
मराठी सिनेमा चा पोस्टर प्रदर्शित झाला त्याच्या काही दिवसातच. कोण आहेस तू ? या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला असून ट्रेलर पाहण्यासाठी यूट्यूब वर कोण आहेस तू टाइप करा किंवा जनहित न्युज महाराष्ट्र ९९६०५०४७२९ या व्हॉट्स ॲप नंबर वर कोण आहेस तू.msg करा बातमी पाहण्यासाठी news link टाइप करा.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद