अंबरनाथ: नगरसेवक सुभाष साळुंके यांनी मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांच्या कडे केली मागणी

नगरसेवक सुभाष साळुंके यांनी मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांच्या कडे केली मागणी
अंबरनाथ शहरात अमृत अभियाना अंतर्गत जून्या व वाढीव क्षेत्रात अद्यावत भुयारी गटार योजना टप्पा -3 योजना राबविणे करिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची
नगरसेवक सुभाष साळुंके यांनी मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांच्या कडे केली मागणी
अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी जुन्या भुयारी गटार योजना कुचकामी ठरली आहे, चेंबर्स नव्याने बांधणे, भुयारी लाईन टाकने, वाढीव क्षेत्रात भुयारी गटार योजना राबविणे इ. बाबत लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या कडून मागणी होत आहे,
याकरिता संपूर्ण शहराचा आवश्यक ठिकाणी भुयारी गटार योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (प्रस्ताव आराखडा DPR) तयार करण्यात यावा, सदर प्रस्ताव अमृत अभियाना अंतर्गत शासनाकडे निधी मागणी करिता पाठविण्यात यावा,अशी मागणी निवेदनाद्वारे नगरसेवक सुभाष साळुंके यांनी मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांच्याकडे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत केली.संबंधित भागाचा सर्व्हे करताना लोकप्रतिनिधींना,नागरीकांना सूचित करावे,असे सुभाष साळुंके यांनी सूचना केली.
यावेळी उपशहर प्रमुख परशूराम पाटील,
नगरसेवक रवींद्र पाटील उपस्थित होते.
याबाबत मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी DPR करण्याकरिता त्वरीत कन्सल्टंट नेमण्यात येईल,असे आश्वाशित केले.
 सुभाष साळुंके यांनी केलेली मागणी योग्य असून यामुळे शहरात अद्यावत व परिपूर्ण भुयारी गटार योजना टप्पा–३ राबविणे शक्य स्वच्छ व निरोगी अंबरनाथ होणेस मदत होईल,असे मत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी व्यक्त केले.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र अंबरनाथ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार