संविधान स्वीकृतिदिनी स्वाक्षरी मोहिम..

संविधान स्वीकृतिदिनी स्वाक्षरी मोहिम..
उल्हासनगर: शशिकांत दायमा
दिनांक 26 नोव्हेंबर 2022
उल्हासनगरात जिल्हा स्तरावरचे मध्यवर्ती रुग्णालय आहे परंतु जिल्हा रुग्णालयाला लागू सुविधा तिथे मिळत नाहीत. वर्षेनुवर्षे हे सुरू आहे. या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. हा आपल्या आरोग्याचा प्रश्न तर आहेच परंतु आपल्या संविधानिक अधिकारांचाही प्रश्न आहे. सिटीजन हेल्थ केअर फाउंडेशन आणि उल्हासनगरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनी एकत्र येऊन नागरिकांच्या संविधानिक आरोग्य हक्कांसाठी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भारताच्या संविधान दिनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी मध्यवर्ती रुग्णालय येथे हस्ताक्षर अभियान राबवले गेले त्यात सिव्हिल सर्जन डॉ बनसोडे, डॉ दोडे यांचे उपस्थितित सिटीजन हेल्थ केअर फाऊंडेशन समन्वयक समाजसेवी शिवाजी रगडे, सतीश मराठे, राज असरोंडकर, नितेश राजपूत, शशिकांत दायमा, जगदीश उदासी, जमील खान, अमोल देशमुख, पवन पचगाडे, सचिन चौधरी, सुनील खंदेकरी, समाधान वाघ प्रमोद घनबहादुर नीतू विश्वकर्मा  गणेश वऱ्हाडे, राजेंद्र देठे, प्रशांत कोळी, विजय बिलडान, प्रभाकर अहिरे, विजय पवार, रोहित परदेशी, समाजसेवी राजू तेलकर हे प्रयत्नशील राहिले,
26 नोव्हेम्बर रोजी संध्याकाळी शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. आपणही या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावं आणि या लढ्याला पाठबळ द्यावं, अशी  अपील सिटीजन हेल्थ केअर फाऊंडेशन तर्फे करण्यात आली होती
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार