नॅशनल हायस्कुल, उल्हासनगर येथे संविधान दिनाचे शानदार आयोजन

नॅशनल हायस्कुल, उल्हासनगर येथे संविधान दिनाचे शानदार आयोजन


दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी ७३ व्या संविधान गौरव दिनानिमित्त नॅशनल हायस्कूल, उल्हासनगर - ४ येथे संविधान दिनाचे सुंदर आयोजन करण्यात आले . संविधान दिनाच्या ह्या दिमाखदार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. श्री शिवाजीराव कटाळे सर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुनायना कटाळे मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद देवरे सर तसेच कार्यक्रम अध्यक्ष सौ. मृणालिनी देशमुख मॅडम आवर्जून उपस्थित होते. ह्या कार्यक्रमात संविधान दिनाचे महत्व व संविधानाबाबतची माहिती देण्यासाठी प्रमुख वक्ता व
मार्गदर्शक म्हणून अशोक वानखडे, सामाजिक कार्यकर्ता हे आमंत्रित होते. कार्यक्रमाचा आरंभ विद्यार्थ्यांनी समुदायिकरित्या  संविधानाची उद्देशिक वाचून केली

तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. बबन नागले (पर्यवेक्षक) यांनी केले. 
शाहीर आकाश पवार, ऐश्वर्या पवार
 ढोलकी वादक अर्जुन, संतोष यांच्या साथीने संविधान विषयक गाणी गाऊन कार्यक्रमाची रंजकता वाढविली. 
विद्यार्थी प्रतिनिधी शुभांगी रुके व सुवर्णा गायकवाड यांनी संविधान गीत गाऊन सर्वांची मने जिकली. 

अशोक वानखडे यांनी संविधानाविषयी उद्बोधक व सध्या सोप्या भाषेत विशेष माहिती दिली. सौ सायली मलबारी मॅडम यांनी आभार प्रदर्शन केल्या नंतर  कार्यक्रमाची सांगता झाली.

ह्या कार्यक्रमात विभागातील अनेक मान्यवर तसेच विद्यालयातील  विद्यार्थ्यांसह  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन उपस्थिती दर्शविली.
ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार