दफ़नभूमीचा प्रस्ताव विखंडित करण्यासाठी आज प्रचंड मोर्चा निघाला.
दफ़नभूमीचा प्रस्ताव विखंडित करण्यासाठी आज प्रचंड मोर्चा निघाला.
दफन भूमीच्या सुरक्षा भिंतीचे कामास स्थगिति दिली व राज्य सरकारकडून प्राप्त पत्रानुसार उमनपा प्रशासनाकडून
अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू________ आयुक्त अजीज शेख,
जुना अंबरनाथ गाव ग्राम मंडळ, सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती मंडळ, बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली पालेगाव, गायकवाड पाडा, कैलास कॉलनी आणि उल्हासनगर क्रमांक 5 येथील रहिवाशांनी आज भव्य मोर्चा काढला
नदी व किनारी कृत्रिम गणेश घाटाचे पावित्र्य लक्षात घेऊन आपल्या श्रद्धेचे व मंदिराचे रक्षण व शांतता लक्षात घेऊन येथे कोणत्याही परिसरात होऊ नये, अशी विनंतीही आंदोलकांकडून करण्यात आली.
29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता शिव मंदिराजवळ जमा होऊन भगवा झेंडा फडकवत घोषणाबाजी करत हजारो लोक शिवमंदिर पासुन उल्हासनगर 5 च्या मच्छी मार्केट, तलाठी तहसीलदार कार्यालय आणि तेथून उल्हासनगर महानगर पालिका मुख्यालयावर आले.
मोर्चाच्या समारोपाच्या वेळी उल्हासनगर महानगर पालिकेच्या वतीने जूने अंबरनाथ गावातील ग्रामस्थ मंडळाच्या समन्वयकांना पत्र देण्यात आले, त्यामध्ये स्मशानभूमीच्या सुरक्षा भिंतीचे काम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.
24 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या पत्राला तसे करण्यास सांगितले असून, तसा अहवाल सादर करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. व आपसातील सहमति द्वारे हा प्रश्न सुटावा अशी कामना उमनपा आयुक्त अजीज शेख द्वारे व्यक्त करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद