दिव्यांगाच्या विकासात आणखी एक नवा मार्ग
दिव्यांगाच्या विकासात आणखी एक नवा मार्ग
उल्हासनगर:दिनांक २७/११/२०२२उल्हासनगर येथे दिव्यांग आधार सेवा संस्था, उल्हासनगर यांच्या प्रयत्नातून महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या तर्फे दिव्यांग ट्राय सायकल लाभधारकांना त्यांच्या व्यवसाय उभारणी साठी प्राथमिक भांडवल उपलब्ध करून देण्यात आले हा कार्यक्रम शरद गोतमारे, सर्विस मॅनेजर, ऑटो नेक्स्ट कंपनी नागपूर तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून दिव्यांग आधार सेवा संस्था, उल्हासनगर या ठिकाणी संस्था कार्यालयात पार पडला.
यावेळी 18 दिव्यांगाच्या हिता साठी त्यांना व्यवसाय करता यावा याकरिता सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, पूजेचे साहित्य तसेच लहान मुलांचे कपडे देऊन त्यांना व्यवसाया करिता भांडवल उपलब्ध करून देण्यात आले
या मुळे दिव्यांग बांधवास एक संजीवनी देवू केली गेली या साठी संस्थेचे अध्यक्ष - सचिन राम सावंत ( दिव्यांग आधार सेवा संस्था ), सौ. छाया सचिन सावंत यांनी अथक प्रयत्न करून दिव्यांगाना हा लाभ मिळवून दिला या सोबत श्री. बी आर पाटील यांनी या कार्यक्रमात मोठे सहकार्य केले आणि श्री. जितेंद्र गायकवाड, श्री. चंद्रभान बागुल, श्री. परमेश्वर बोखरे यांनी कार्यक्रम मा. अध्यक्ष याच्या मार्गदर्शना पार पडला.या कार्यक्रमा नंतर सर्व लाभधारक सभासदानी संस्था आणि अध्यक्षांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली
ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
संपादक हरी आल्हाट 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद