डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत संविधानातील उद्देशिकामध्ये आहे* - नवनाथ रणखांबे यांचे प्रतिपादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत संविधानातील उद्देशिकामध्ये आहे* - नवनाथ रणखांबे यांचे प्रतिपादन
( प्रतिनिधी आशा रणखांबे )
ठाणे : भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा यांच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिन ठाणे जिल्हाध्यक्ष
विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शक वक्ते साहित्यिक कायदयाचे अभ्यासक
नवनाथ रणखांबे यांच्या उपस्थितीत आनंद बुद्धविहार आनंदवाडी कल्याण (पूर्व) येथे संपन्न झाला.
मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . सामूहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस प्रभाकर सूर्यवंशी म्हणाले की, "संविधान स्वीकारून आपणास 73 वर्षे झाले. या 73 वर्षांमध्ये संविधानाच्या प्रमाणे अंमल बजावणी होत आहे की नाही या संदर्भामध्ये लोकांमध्ये संविधानाची खरी साक्षरता होण्यासाठी सर्वसामान्या पर्यत संविधान पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून असे कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने आपण ठाणे जिल्हा शाखेच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला आहे. यासाठी कायद्याचे जाणकार अभ्यासक कायद्याचे विद्यार्थी नवनाथ रणखांबे यांना भारतीय संविधान या विषयासाठी वक्ते म्हणून निमंत्रित केले आहे .
यावेळी मार्गदर्शक वक्ते नवनाथ रणखांबे यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगितले. भारतीय संविधाचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य सांगून संविधानावर आधारित कार्यप्रणालीवर मार्गदर्शन केले.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता, स्वातंत्र व न्याय तसेच प्रज्ञा शिल करूणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बिजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत संविधानातील उद्देशिकामध्ये आहे. संविधान मूल्ये ही क्रांतिकारी आहेत." असे मत यावेळी नवनाथ रणखांबे यांनी व्यक्त केले.
यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड म्हणाले, " आजही आपल्या देशात गेल्या कांही वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने जे काही संविधानावर हल्ले होत आहेत. त्याला कुठे तरी पायबंद घालण्यासाठी आपण सर्वजण जागृत असले पाहिजे संविधान वाचवण्याचे काम केले पाहिजे आणि संविधाना प्रमाणे आपला देश चालला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे
यावेळी कोषाध्यक्ष उत्तम सोनवणे , उपाध्यक्ष आनंद दोंदे, संघटक अशोक उमाकांत जाधव , कल्याण तालुका अध्यक्ष अशोक जयराम जाधव , उल्हासनगर तालुकाध्यक्ष अशोक जाधव , सरचिटणीस रोशन पगारे , बदलापूर सरचिटणीस मिलिंद गायकवाड , तालुकाध्यक्ष सुनील निकम, सरचिटणीस अनिल चव्हाण , मेजर जनरल रमेश वाघमारे , मेजर बाळासाहेब आठवले , सर्व तालुक्यांचे पदाधिकारी केंद्रीय शिक्षक - शिक्षिका, समता सैनिक दलाचे सैनिक, अधिकारी इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रतिनिधी आशा रणखांबे जनहित न्युज महाराष्ट्र जिल्हा ठाणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद