उल्हासनगर पालिकेचे 200 बेडचे हॉस्पिटल सध्या धुळखात..

उल्हासनगर पालिकेचे 200 बेडचे हॉस्पिटल सध्या धुळखात..

कल्याण मुरबाड महामार्गावर आणि म्हारळगावासमोर बांधण्यात आलेले उल्हासनगर पालिकेचे सुमारे 200 बेडचे हॉस्पिटल सध्या धुळखात पडले आहे, याचे ना उद्घाटन ना या करिता स्टाफ नियुक्त केला नसल्याची खात्रीलायक माहिती असून सध्या देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची टांगती तलवार असताना हे असे 'धुळखाणे' कितपत योग्य आहे, याचा लोकप्रतिनिधी सह,सत्ताधारी आमदार, खासदार, नेते, पुढारी, यांनी विचार करायला हवा.
कल्याण मुरबाड महामार्गाशेजारी आणि म्हारळ गावाच्या प्रवेशद्वारासमोर उल्हासनगर पालिकेने सुमारे 200 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल बांधले याला आज दिड ते दोन वर्षे व्हायला आलीत, हे हॉस्पिटल कल्याण मुरबाड महामार्गावर असल्याने येथे उपचारासाठी येण्याजाण्याची खास सोय आहे, शिवाय म्हारळ, वरप, कांबा या वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी हे रुग्णालय अतिशय उपयुक्त ठरणार आहे
याशिवाय सध्या देशासह राज्यावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकट घोंघावत आहे, मुंबई पुणे, आदी शेजारच्या शहरामध्ये कोरोनाचे एक्टिव पेंशट सापडत आहेत, मागील कोरोना काळातील अनुभव पाहता या चौथ्या लाटेचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी पुरेसा औषध साठ्यासह आपली रुग्णालये, सुसज्ज सर्व आवश्यक स्टाफ सह असणे अत्यावश्यक असताना हे 200 बेडचे रुग्णालय मात्र सध्या तरी धुळखात पडले आहे स्थानिक नागरिक हे रुग्णालय चालू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. 
      ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

  1. वोट वापसी जिला चिकित्सा अधिकारी, राज्य चिकित्सा मंत्री, आणि मुख्यमंत्री हा कायदा पास केला पाहिजे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

    8452036906

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार