प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आमरण उपोषण सुरू असतानाच रस्ते कामाला सुरुवात
प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आमरण उपोषण सुरू असतानाच रस्ते कामाला सुरुवात अंबरनाथ मधील फुलेनगर गुप्ता तबेला पासून जावसई रिक्षा स्टॅन्ड पर्यंतचा राहदारीचा डांबरीकरण रस्ता अर्धवट बनविण्यात आला होता तो रस्ता पूर्ण बनवून मिळावा या करिता प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने अंबरनाथ नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना अनेक वेळा पत्र व्यवहार करून मागणी केली असतानाही रस्त्याचे काम होत नव्हते दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष, आलम खान, कुशाल सोनकांबळे, दत्तात्रेय घोगरे, सोनू नायक, अभिमन्यू गुप्ता, सोनू चव्हाण, यांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि काही तासातच महानगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी तात्काळ रस्ता दुरूस्तीला परवानगी देत रस्ता दुरूस्तीचे काम उपोषण सुरू असतांनाच सुरू केले
तसेच अंबरनाथ येथील फुलेनगर मधील सर्व स्ट्रीट लाईटवर जूने लाईट बदलून एलईडी लाईट सुद्धा सुरू करण्यात आल्या
तसेच रस्ता कायमस्वरूपी बनवण्याकरीता २०२२-२०२३ मार्च २०२३ अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली असल्याबाबत पत्राद्वारे लेखी आश्वासन देण्यात आले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद