अद्वैत थिएटर्स'चे २५ वे नाटक 'थँक्स डियर' रंगभूमीवर
अद्वैत थिएटर्स'चे २५ वे नाटक 'थँक्स डियर' रंगभूमीवर
अद्वैत थिएटर्स, मोरया थिएटर्स व सर्वस्य प्रॉडक्शन या नाट्यसंस्थांनी मिळून निर्मिती केलेले 'थँक्स डियर' हे नाटक आता रंगभूमीवर आले आहे. या नाटकाचा २५ डिसेंबर रोजी पुण्यात शुभारंभ झाला असून, ३१ डिसेंबरला मुंबईत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. आतापर्यंत लोकप्रिय नाट्यकृती रंगभूमीवर आणणाऱ्या 'अद्वैत थिएटर्स'चे हे २५ वे नाटक आहे. निर्माते भाऊसाहेब भोईर, राहुल भंडारे व श्रद्धा हांडे यांनी संयुक्तरित्या या नाटकाच्या निर्मितीची सूत्रे सांभाळली आहेत.
या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन निखिल रत्नपारखी व तुषार गवारे यांनी मिळून केले आहे. निखिल रत्नपारखी व हेमांगी कवी हे कलाकार या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. श्रद्धा हांडे यांची वेशभूषा, उलेश खंदारे यांची रंगभूषा व गंधार यांचे संगीत अशी टीम या नाटकासाठी काम करत आहे. वर्षअखेरीस या नाटकाच्या निमित्ताने रसिकांना 'थँक्स डियर' म्हणण्याची संधी मिळाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद