उल्हासनगर महानगरपालिका चे सेवानिवृत्त कर्मचारी यांनी सातवा वेतनाच्या देयकाबद्दल नाराजी व्यक्त केली
महानगरपालिका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक यांना सातवा वेतन ची देय असलेली रक्कम एक रक्कमी मिळावी जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहाचा आणि औषध उपचाराचा खर्च भागवता येईल कारण मागील काही वर्षापासून सातवा वेतनाची रक्कम मिळेल याची आशा करून अनेक वयोवृद्ध सेवानिवृत्त झालेले कर्मचारी मृत्यू पावले आहेत
महानगर पालिका आयुक्त अजिज शेख हे कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत त्यांनी अनेक कामगारांचे व शहर विकास कामांचे प्रश्न मार्गी लावले आहेत
तसेच मनपा आयुक्त अजिज शेख यांनी वयोवृद्ध सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांचा हि विचार करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी सेवा निर्वूत ज्येष्ठ नागरिक मनपा आयुक्त अजीज शेख यांचे कडे करणारं आहेत
त्यांना आरएक टप्प्यात किंवा दोन टप्प्यात सातवा वेतनाचा लाभ देण्यात यावा असी अपेक्षा सेवानिवृत्त कर्मचारी करीत आहेत
महानगर पालिका चे नियमानुसार कर्मचारी यांना 58 किंवा 60 वर्षात सेवानिवृत्त करावे लागते हा शासनाचा नियम आहे 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला असला तरी आता पर्यंत त्यांना थक्कीत रक्कम देण्यात आली नाही सेवा निर्वुत कामगारांचे वय वाढत आहे 2016 मध्येच रिटायर झालेला कर्मचारी सात वर्षात 2023 मध्ये 67 वर्षाचा झाला आहे तर 2010 मध्ये रिटायर झालेला कर्मचारी 77 वर्षाचा वृद्ध ज्येष्ठ नागरिक झाला आहे
असे अनेक ज्येष्ठ नागरिक सातवा वेतन ची थकीत रक्कम ह्या महिन्यात मिळेल असे आश्वासन ऐकून ऐकून मृत्यू पावले आहेत त्यांच्या सातव्या वेतनाच्या अपेक्षा मात्र पूर्ण झाल्या नाहीत ?
त्यातच युनियन संघटना फक्त सातवा वेतन मिळावे यासाठी सतत निवेदन पत्र देतात आणि पुन्हा शांत बसतात सतत फक्त निवेदन पत्र देणे चालू असते
60 वर्षात सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांना स्वतःचे उदरनिर्वाह तसेच औषध उपचाराचा लागणारा खर्च वाढत आहे परंतु महागाई च्या काळात सुद्धा महिन्याच्या मिळणाऱ्या तुटपुंज्या पेंशिन वर खर्च भागवावा लागत आहे
परंतु त्यांची व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न मनपा अधिकारी यांनी कधीच केला नाही युनियन संघटना फक्त सातवा वेतन मिळावे या साठी सतत मागणी करतात परंतु ज्येष्ठ नागरिकांना प्रथम पूर्ण रक्कम देण्यात यावी ही मागणी आज पर्यंत कोणत्याही युनियन ने केली नाही याची खंत वाटते ?
त्यातच नेहमी प्रमाणे सध्या ही व्हॉट्स ॲपवर एक रेकॉर्डिंग ऑडिओ व्हायरल झाला आहे तो आवाज युनियन अध्यक्ष यांचा असून त्यांचे म्हणणे आहे की कामगारांना लवकरच सातवा वेतन ची थकीत रक्कम एक दोन टक्क्या प्रमाणे मिळणार आहे
परंतु सेवा निर्वूत असलेल्या ज्येष्ठ नागरिक जे वयाने 60 ते 90 वर्षाचे झाले आहेत त्यांना किती टक्के मिळणारं हे मात्र सांगत नाहीत फक्त सांगतात ती टक्केवारी एक किंवा दोन ?
या टक्केवारी मुळे सर्व रिटायर कर्मचारी संभ्रमात पडले आहेत की ज्येष्ठ नागरिकांना जर टक्केवारी प्रमाणे थकीत रक्कम मिळाली तर अजून किती वर्षे लागतील मनपा कडून सातवा वेतन ची थकीत पूर्ण रक्कम मिळायला ? तो पर्यंत अजून किती ज्येष्ठ नागरिक मृत्यू पावले जातील आणि त्यांच्या सातवा वेतन ची थकीत रक्कम मिळण्याची अपेक्षा मात्र तशीच राहीन म्हणून अनेक रिटायर ज्येष्ठ नागरिक स्वतःच सातवा वेतन मिळविण्या साठी पुढे पाऊल टाकणारं आहेत लवकरच मनपा आयुक्त अजीज शेख यांना विनंती निवेदन पत्र देवून रिटायर कर्मचारी यांना एक किंवा दोन टप्प्यात थकीत रक्कम देण्यात यावी अशी विनंती पूर्वक मागणी करणारं आहेत
सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक यांना एक किंवा दोन टप्प्यात देयके मिळाली नाही तर महानगरपालिकेच्या गेट समोर सर्व प्रथम ठिय्या आंदोलन सुरू करणारं नंतर गरज पडल्यास उपोषण करण्याची सुद्धा तयारी असल्याची माहिती सेवानिवृत्त कर्मचारी यांनी दिली आहे या मागणी करिता लवकरच मनपा आयुक्त अजिज शेख यांना निवेदन पत्र देऊन विनंती करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद