श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त "भक्ती-शक्ती" चौक येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त "भक्ती-शक्ती" चौक येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण
अंबरनाथ: नगरसेवक श्री सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून  उभारलेल्या छत्रपती शिवराय व जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या भेटीचे शिल्प अर्थात "भक्ती-शक्ती" चौक येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकोबाराय यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ शिवसैनिक श्री. चद्रकांत फाळके मामा यांना पुष्पमाला अर्पण करण्याचा मान देण्यात आला.
मा.नगरसेवक श्री. सुभाष साळुंके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोवाडे व घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी श्री. सुभाष साळुंके यांच्या सोबत  मा.नगरसेवक श्री. रविंद्र करंजुले,संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके , आम्ही रायगडकर प्रतिष्ठान चे कैलास फलके, अनेक शिवप्रेमी नागरिक, संस्था व मान्यवर उपस्थित होते.बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत