महाशिवरात्री निमित्त प्रसाद वाटप कार्यक्रमास शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद

महाशिवरात्री निमित्त प्रसाद वाटप कार्यक्रमास शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद
अंबरनाथ : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नगरसेवक सुभा उपष साळुंके, संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांच्या वतीने यात्रेकरूं, शिवभक्तासाठी 150 कि. उकडलेले शेंगदाणे, 100 किलो शेव बुंदी तसेच 500 लिटर थंड बिसलेरी पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले
रोटरी क्लब हॉल समोरील चौकात उभारलेल्या सेवा स्टॉल अर्थात प्रसाद वाटप उपक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या हस्ते करण्यात आले 
प्रसाद वाटप करताना शिवसेना कार्यकर्ते, संवाद फाऊंडेशन व जॉगर्स क्लब च्या सदस्यांनी परिश्रम घेतले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार जमखंडिकर,भाऊ केंगरे, चंद्रकांत फाळके,विलास शेट्ये, गोविंद शेडगे, सुमित बनसोडे,सुनिल देशपांडे,सार्थक साळुंके,तुषार बिवलकर सौ. प्रतिभा पाटील,रुपाली मोरे,आशाताई शेकोकरे,मनिषा मासाने,सुनिता रघुनाथन,सुषमा आचरेकर,कल्पना पलंगे,उषाताई गायकवाड,नंदा देशपांडे,मानसी साळुंके यांनी परिश्रम घेतले. 
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. प्रज्ञा बनसोडे, शिवसेना महिला आघाडीच्या सौ.लिना सावंत,अनिता लोटे,सुषमा रसाळ,डॉ.श्रीकांत गर्जे,उद्योजक संदिप तेलंगे,गुणवंत खरोडिया , निलेश झांजे,मंगेश पाडगांवकर,निलेश विसपुते, भगवान सोलंकी,श्रीमती पौर्णिमा जावळे,सौ.कविता कबरे तसेच पोलीस अधिकारी यांनी भेट दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार