शहिद भिमसैनिक दिपकभाऊ संसारे यांच्या वाढदिवसा निमित्त प्रबोधन कार्यक्रम

शहिद भिमसैनिक दिपकभाऊ संसारे यांच्या वाढदिवसा निमित्त प्रबोधन कार्यक्रम उल्हासनगर: 
शहिद भिमसैनिक दिपकभाऊ संसारे यांच्या वाढदिवसा निमित्त प्रबोधन कार्यक्रम दिपक भाऊ संसारे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष भिकन संसारे व मुकेश चौथमल यांनी आयोजित केला होताकार्यक्रमाला शहर भरातून नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.आयोजकांनी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष उज्वल महाले,निरिक्षक ईश्वर सोनवणे,शहर सचिव हरेश कथले,शहर उपाध्यक्ष सुरेंद्र तिडके,वार्ड अध्यक्ष नितिन भालेराव,वरिष्ठ कार्यकर्ते धनराज मोरे वरिष्ठ कार्यकर्ते संजय खरे, वरिष्ठ कार्यकर्ते रवि महाले, वरिष्ठ कार्यकर्ते गणेश तांबे यांना आमंत्रित केले होते.युवानेते उज्वल महाले (रंगीला) यांनी भाषनात बोलतांना प्रबुद्ध नगर ते साई बाबा मंदिर या मार्गाला भिमसैनिक दिपकभाऊ संसारे मार्ग असे नाव देण्यात यावे व लवकरात लवकर काँक्रीटीकरण करण्यात यावे म्हणून वंचित बहुजन आघाडीने उल्हासनगर महानगरपालिकेला रितसर निवेदन दिले आहे जर असे झाले नाही तर शहर भरातून मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा भाषनातून युवानेते उज्वल महाले महाले यांनी दिला. यावेळी वंचितचे युवा कार्यकर्ते मनोज जगताप,युवा कार्यकर्ते निलेश खरे,युवा कार्यकर्ते बंटी सावळे,जितू बागुल,भिमा पगारे,कु.सुमित जाधव व इतर कार्यकर्ते आणि स्थानिक महिला पुरूष ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती उज्वल महाले यांनी दिली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत