प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी जिजाऊ संघटनेचा उपोषणाला प्रारंभ, निलेश सांबरे प्रकल्पग्रस्तांच्या सोबत बसले उपोषणाला

प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी जिजाऊ संघटनेचा उपोषणाला प्रारंभ, निलेश सांबरे प्रकल्पग्रस्तांच्या सोबत बसले उपोषणाला
पालघर : जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी तसेच शासनाने नमूद केलेल्या नागरी सुविधांपासून वंचित राहिलेल्या घटकांसाठी प्रशासनाच्या विरोधात जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, त्यांचे सहकारी व प्रकल्पग्रस्त नागरिक यांनी आज मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला असून उपोषणाच्या आजच्या पहिल्याच दिवशी हजारो प्रकल्पग्रस्त तसेच अनेक सामाजिक संघटना कार्यकर्ते व पालघर जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी जाहिर पाठिंबा देत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.निलेश सांबरे व सहकाऱ्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उपोषणाचा पहिल्या दिवसाचा प्रारंभ झाला.

पालघर जिल्हा म्हणजे सागरी,नागरी आणि डोंगरी या तिन्हींचा संगम
या डोंगराळ भागात प्रामुख्याने आदिवासी वस्ती जास्त असल्याने आदिवासींचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. आदिवासींचा जिल्हा असल्यामुळे आदिवासी उपाययोजनेमधून आजपर्यंत अनेक प्रकल्प या जिल्ह्यात आणले गेले पण आजतोवर काही पूर्ण न होता किंवा अजूनही अपूर्ण स्थितीमध्ये असताना शासकिय अधिकाऱ्यांना हाताशी धरून भ्रष्ट राजकारण्यांनी कम ठेकेदारांनी निविदा प्र.मा.तीन ते चार वेळा वाढवून या प्रकल्पांमध्ये अफराताफर केल्याची मोठ्या प्रमाणात दिसून तर येतेच, पण येथील आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना त्यांचा मोबदला आणि सुविधांपासून आजपर्यंत वंचित ठेवले गेले. आजही अनेक धरणे या जिल्ह्यात बांधली तरीही येथील स्थानिक नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. येथील नागरिकांना रोजगार तर नाहीच या उलट जे काही प्रकल्प या ठिकाणी झालेत त्यातील काही आजही अपूर्ण स्थितीत दिसून येतात.यामध्ये सूर्या-धामणी-कवडास धरण,लेंडी व खडखड धरण,वाघ प्रकल्प,तुळ्याचापाडा,पिंपुर्णा आणि धसई, देहर्जे धरण या प्रकल्पांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. याच विरोधात जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त व स्थानिक नागरिकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे. अशी माहिती बातमीदार सचिन शिंदे यांनी दिली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार