अग्नीवीरांची पहिली तुकडीची पासिंग आऊट परेड दिमाखात संपन्न




अग्नीवीरांची पहिली तुकडीची पासिंग आऊट परेड दिमाखात संपन्न
मुंबई - अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड मंगळवार 28 मार्च रोजी मुंबईतील आयएनएस चिल्का येथे संपन्न झाली.
अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या सैनिकांची पहिली तुकडी नौदलात दाखल होणार आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीने आयएनएस चिल्का येथे पासिंग आऊट परेडसह त्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारंपारिकपणे सकाळी होणारी परेड आता पहिल्यांदाच सूर्यास्तानंतर आयोजित करण्यात आली होती
आयएनएस चिल्का येथे प्रशिक्षण घेत असलेल्या 273 महिला अग्निवीरांसह जवळपास 2600 अग्निवीरांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार हे प्रमुख पाहुणे आणि पासिंग आऊट परेडचे पुनरावलोकन अधिकारी उपस्थित होते. फ्लॅग ऑफिसर, कमांडिंग-इन-चीफ सदर्न नेव्हल कमांडसह इतर वरिष्ठ नौदल अधिकारी आणि मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

यशस्वी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या सागरी प्रशिक्षणासाठी आघाडीवर असलेल्या युद्धनौकांवर तैनात केले जाईल.अग्निवीरांच्या या पहिल्या तुकडीत त्या महिला आणि पुरुष अग्निवीरांचाही समावेश आहे ज्यांनी या वर्षी जानेवारीला कर्तव्य पथ येथे भारतीय नौदलाच्या परेड दलात सहभाग घेतला होता. अग्निवीरांनी भारतीय नौदलाची खलाशांसाठीची प्रशिक्षण संस्था आयएनएस चिल्का येथे 16 आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले. आयएनएस चिल्का येथील प्रशिक्षणामध्ये कर्तव्य, सन्मान आणि धैर्य या प्रमुख नौदल मूल्यांवर आधारित शैक्षणिक, सेवा आणि मैदानी प्रशिक्षण समाविष्ट होते

बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत