पंतप्रधान यांच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत "हर घर नल, हर घर जल" याचे भुमिपूजन

पंतप्रधान यांच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत "हर घर नल, हर घर जल" याचे भुमिपूजन रायगड जिल्ह्यातील उरण तालुका येथील जासई डुंबावाडी येथे पंतप्रधानांच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत "हर घर नल, हर घर जल" याचे भुमिपूजन उरण विधानसभेचे आमदार महेश सेठ बालदी, गटविकास अधिकारी समीर प्रकाश वाठस्कर, भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, बळीराम घरत,ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जासई, डुंबावाडी येथे असलेली वस्ती ही लभान बंजारा समाजाची आहे अन येथील लोकवस्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी "तांडा विकास योजना" लागू करावी अशी मागणी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी केली, तसेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो, देश सुजलाम सुफलाम झाला असला तरीही भटके विमुक्त समाजाच्या समस्या आजही सुटलेल्या नाहीत अशी खंत व्यक्त केली, जासई डुंबावाडी येथील नागरीकांना मुलभुत सुविधा पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधून द्यावी अशी विनंती याप्रसंगी करण्यात आली तसेच सदर जमिन ही वनविभागाची असल्याची माहिती स्थानिकांकडुन मिळाल्याचे सांगत या लोकाना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आमदार साहेबाना सोबत घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन याप्रसंगी बोलतानां भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यानी दिले.
  कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार महेश शेठ बालदी यांनी डांगे साहेबांनी केलेल्या मागण्या या रास्त असून आम्हाला व प्रशासनाला या जासई डुंबावाडीतील लोकांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला अशी जाहिर कबूली देत, स्थानिक प्रशासन असो जिल्हाधिकारी कार्यालय असो, मंत्रालय असो वनविभाग असो वैयक्तिक लक्ष घालुन या नागरीकाना कसा न्याय मिळवून देता येईल यासाठी पुरेपुर प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार महेश सेठ बालदी यांनी दिले. यावेळी गटविकास अधिकारी वाठस्कर यांनी योजनेची माहिती देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
   सदर कार्यक्रमा साठी जासई ग्रामपंचायत सदस्य व परीसरातील कार्यकर्ते तसेच जासई डुंबावाडी येथील लभान बंजारा समाजाच्या माता भगीनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोरीलाल भालेकर, प्रकाश येरकर व विजय भिडे यांनी पुढाकार घेतला. अशी माहिती भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार