माननीय सिताराम गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

माननीय सिताराम गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
 डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत करणारे जब्बार पटेल यांच्या हस्ते सन्मान मिळणे हाच खरा सर्वोच्च सन्मान         
मुंबई प्रतिनिधी आशा रणखांबे
सिताराम गायकवाड यांचे प्रतिपादन 
आपल्या स्वतःच्या राहत्या झोपडी मध्ये बाबासाहेबांचे एका फलकावर नाव लिहून आदिवासी मुला मुलींसाठी शैक्षणिक कामाची सुरुवात अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेमार्फत केली आज या संस्थेच्या तीन माध्यमिक दोन प्राथमिक व एक जुनियर कॉलेज या शैक्षणिक प्रकल्पांद्वारे बहुजनांच्या विकासासाठी गेली 40 वर्ष काम करीत आहेत या संस्थेचे संस्थापक व संस्थाप्रमुख माननीय सिताराम गायकवाड यांचा अध्यक्ष ऑल इंडिया एससी ,एसटी कर्मचारी ओ.एन.जी.सी. चे महाप्रबंधक माननीय श्री जागेश सोमकुवर मुंबई यांच्या विद्यमाने आयोजित भीम जयंती निमित् श्री .सिताराम गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.बाबासाहेबांच्या विधायक विचारांचा वसा घेऊन श्री. सोमकुवर, श्री. वानखेडे, श्री. निकाळजे , श्री.कटारे, श्र रघुनाथ कारगावकर व त्यांचे अनेक सहकारी गेली अनेक वर्ष निष्ठृह पणे काम करीत आहेत सन 2008 साली त्यांनी संस्थेच्या शिरोळे आश्रम शाळेला भेट दिली व पहिली मदत 72 हजार रुपयांची केली. त्यामुळे खरी सी.एस.आर ची माहिती ओ.एन.जी.सी ने करून दिली, व त्यामुळे जगातील अनेक मल्टी नॅशनल कंपनीच्या मार्फत संस्थेच्या शाळांना इमारती बांधून मिळाल्या. या यशाचे मानकरी ओ.एन.जी.सी चे व्यवस्थापकीय महासंचालक व अर्थात एससी, एसटी वेल्फेअर असोसिएशनचे आहे असे गौरव उद्गार सिताराम गायकवाड यांनी काढले .
 माननीय श्री विजयराज,  कार्यकारी संचालक एच. आर. ओ. व ओ.एन.जी सी च्या व्यवस्थापकीय संचालकांचे आभार व्यक्त करताना श्री सिताराम गायकवाड यांनी एसी, एसटी कंपोनंट प्लॅन वर मर्यादा न ठेवता तो निधी वाढवून देण्यासाठी विनंती केली विशेष म्हणजे सिताराम गायकवाड यांना माननीय राज्यपाल श्री भगतसिंह कोशारी यांनी दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी 
डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय योगदान या पुरस्काराने राजभवन येथे गौरविण्यात आले. सामाजिक कामाच्या उत्तुंग भरारी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार