मुंबई : बेस्ट’मध्ये मोबाइलचा मोठा आवाज करून गाणी ऐकल्यास होणारं पोलिसांत तक्रार

मुंबई : बेस्ट’मध्ये मोबाइलचा मोठा आवाज करून गाणी ऐकल्यास होणारं पोलिसांत तक्रार
मुंबई : बस किंवा रेल्वेमधून प्रवास करताना मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलणारे, गाणी ऐकणारे किंवा वेगवेगळे व्हिडिओ पाहणारे, यांचा अन्य प्रवाशांना नेहमीच जाच होतो. आता किमान ‘बेस्ट’ बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची यातून सुटका होणार आहे. ‘बेस्ट’ने मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलण्यास, गाणी ऐकण्यास मनाई केली आहे. तसेच याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे आदेश ‘बेस्ट’ प्रशासनाने दिले आहेत.

‘बेस्ट’ उपक्रमाच्या बसमधून दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. काही प्रवासी मोबाइलवरून अन्य व्यक्तीशी मोठय़ा आवाजात संभाषण करीत असतात. काहीजण मोठय़ा आवाजात गाणी ऐकतात. याचा सहप्रवासी तसेच वाहक आणि चालकांनाही त्रास सहन करावा लागतो. वाहकाने प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाकडे याबाबत मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्या. त्यांची दखल घेऊन मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलणाऱ्या वा गाणी ऐकणाऱ्या प्रवाशांना अद्दल घडविण्याचा निर्णय घेण्यात आला. २४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार मोबाइलचा लाऊडस्पीकर वापरणाऱ्यांना समज देण्याची सूचना चालक, वाहक आणि तिकीट तपासनीसांना करण्यात आली आहे. संबंधित प्रवासी वाद घालत असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे. सहप्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी बोलताना, गाणी ऐकताना इयर-फोनचा वापर करण्याचे आवाहन ‘बेस्ट’ने केले.बसमधून प्रवास करताना मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलण्याचा, मोठय़ा आवाजातील गाण्यांचा सहप्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी ‘बेस्ट’ने संबंधितावर कारवाईचा निर्णय घेतला आहे. प्रथम त्याला समज द्या आणि त्यानंतरही त्रास सुरूच राहिल्यास पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. – मनोहर गोसावी, उप जनसंपर्क अधिकारी, ‘बेस्ट’ उपक्रम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप