माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या प्रयत्नाने चार दिवसात पाईपलाईन टाकण्याचे काम चालू
4 दिवसात पाईप लाईन टाकण्याचे काम चालू
अंबरनाथ: श्रीकृष्ण नगर ,श्री गणेश सेवा संघ (कमल गल्ली), इंद्रनील बिल्डिंग लगतचा परिसर इ. ठिकाणी जूनी पाण्याची पाईप जीर्ण झाल्याने काही ठिकाणी पाईप गटारातून जात असल्याने तसेच ड्रेनेज चोकअप झाल्यावर सांडपाणी लिकेज असलेल्या पाण्याच्या लाईंनमध्ये जाऊन त्यावेळी दूषित पाणी पुरवठा इंद्रनील बिल्डिंग लगतच्या बैठया चाळींमधील रहिवाश्यांना होत असल्याची तक्रार महिलानी मा. नगरसेवक श्री. सुभाष साळुंके यांच्याकडे केल्यानंतर त्वरीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (पाणी पुरवठा) विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बसंगर तसेच शाखा अभियंता श्री. शेकोकारे यांना प्रत्यक्ष भेटून चर्चेअंती लेखी निवेदन दिले होते,
पहिल्या टप्प्यात जुनी व जीर्ण झालेली जी आय ची पाईप लाईन त्वरीत बदलणे बाबत व नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा करणेबाबत आग्रही भूमिका घेतली. संबधित अधिकाऱ्यांनी परस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरीत नवीन पाईप लाईनस ठेकेदारास आदेशित केले .
यावेळी सुभाष साळुंके व सौ. सुवर्णा साळुंके यांच्या एकत्रित प्रयत्नास यश आले.
विठ्ठल मंदिर समोरील सार्व. शौचालय ते इंद्रनील बिल्डिंग पर्यंत नवीन 4 इंची HDP पाईप लाईन टाकणे.
इंद्रनील बिल्डिंग ते गजानन स्मृती बिल्डिंग पर्यंत नवी 3 इंची HDP पाईप लाईन टाकणे
याकामाचा शुभारंभ
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती पुर्वसंध्येला मा.नगरसेवक- सुभाष साळुंके यांनी ज्येष्ठ नागरिक श्री. गणपत सणस, सतिश पन्हाळे व मुरलीधर चौधरी व श्रीमती गावडे मावशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्याचा मान दिला.
यावेळी शाखा अभियंता श्री. शेकोकरे, mjp चे चंद्रकांत जाधव, संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके, सौ.सुनंदा मांढरे,सौ. सुवर्णा नारे,सौ. सुप्रिया दुधाणे, सौ.मोरे अनिता सणस,मंगल शिंदे, सुरेखा सणस, वैजयंती राऊळ, सोनल देसाई ,वालावलकर, श्रीमती परदेशी, भाभी, विलास शेट्ये,राजकुमार जमखंडीकर, पाटील काका, गोविंद शेडगे, भाऊ केंगरे, नंदू शेलार, सौ. वैशाली शेलार, सुमित बनसोडे तसेच इतर महिला वर्ग उपस्थित होते.
यावेळी सुभाष साळुंके यांनी तक्रारीची दखल घेऊन 4 दिवसात पाईप लाईन टाकण्याचे काम चालू केल्याने परिसरातील नागरिकांनी मा. नगरसेवक श्री. सुभाष साळुंके व सौ. सुवर्णा साळुंके यांचे आभार व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद