विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाचनालय..
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाचनालय..
प्रमुख मार्गदर्शक जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले..
उल्हासनगर :
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आज दिनांक ११/४/२३ रोजी बुद्धभूमी येथे बौद्ध विहार संघटना समन्वय समितीने आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन व वाचनालयाचे उद्घाटन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. उपस्थित सर्व मान्यवरांकडून आदर्शांचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय भंते गौतमरत्न महाथेरो यांनी सुरुवातीला त्रिशरण पंचशील तसेच धम्मगाथा देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक जमीर लेंगरेकर सर अतिरिक्त आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच करिअर डेव्हलपमेंट फौंडेशन संस्थापक सुनील कदम सरांनी सुद्धा मुलांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले, समितीचे सचिव इंजिनियर गौतम बस्ते सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक आठवले सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार व्यक्त केले. समितीचे कार्याध्यक्ष नवीन गायकवाड यांनी मार्गदर्शन केले व समितीच्या पुढील वाटचालीसाठी काही सूचना विद्यार्थ्यांना दिल्या. सर्व समन्वयकांच्या आर्थिक श्रमिक कार्यातून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आनंदा होवाळ, रोहिणी ताई जाधव, सुरेश काटारे उपस्थित समिती पदाधिकारी व समन्वयक अध्यक्ष विनायक आठवले, सचिव इंजिनिअर गौतम बस्ते, कार्याध्यक्ष नवीन गायकवाड,सहसचिव विजय हळदे, खजिनदार नूतन मुठघरे, सह खजिनदार साक्षी डोळस, प्रचारक विकी ढिवरे, संघटक मीरा सपकाळे, मंगल जाधव, लोकेश कांबळे, लक्ष्मी भवरे, शोभा खैरे, डॉ अलका पवार, गणेश मोरे, राजू रोकडे, आदित्य बस्ते, व सर्व समन्वयक उपस्थित होते,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद