उल्हासनगर महानगरपालिकांच्या शाळा कशा सुधारता येतील यासंदर्भात आयुक्त अजिज शेख यांनी केले मार्गदर्शन
उल्हासनगर महानगरपालिकांच्या शाळा कशा सुधारता येतील यासंदर्भात आयुक्त अजिज शेख यांनी केले मार्गदर्शन उल्हासनगर: दि,9 मे 2023 रोजी मनपा आयुक्त अजिज शेख यांनी स्टॅंडिंग कमिटी सभागृह येथे सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत जमीर लेंगरेकर सुभाष जाधव , अशोक नाईकवाडे , शिक्षण अधिकारी मोरे , किरण भिलारे , योगेश मराठे , उपस्थित होते .तसेच शिक्षण विभागाचे व समग्र शिक्षा चे सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते. यादरम्यान योगेश मराठे यांनी पीपीटी सादर केली . शाळेतील शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची संख्या व तसेच निपुण भारत याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आयुक्त अजिज शेख यांनी शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा कसा सुधारता येईल व शाळेची भौतिक सुविधा व उल्हासनगर महानगरपालिकांच्या शाळा कशा सुधारता येतील यासंदर्भात मार्गदर्शन केले व काही सूचना देखील दिल्या. समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थी पीपीटी मध्ये सादर करण्यात आले.समावेशित शिक्षणाची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यात दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या, प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांची संख्या ,यु डी आय डी काढलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तसेच भत्ते अदा केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आयुक्त अजिज शेख यांच्या समोर मांडण्यात आली. मार्गदर्शन करताना आयुक्त अजिज शेख यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे यु डी आय डी आणि दिव्यांग प्रमाणपत्र जास्तीत जास्त निघाले पाहिजे यावर भर दिला. तसेच जर दिव्यांग विद्यार्थ्यांना बाहेर घेऊन जायचे असतील तर महानगरपालिकेची गाडी वापरली तरी चालेल असे त्यांनी सांगितले. परंतु दिव्यांग विद्यार्थी कुठल्याही सोयी सुविधांपासून वंचित राहिला नाही पाहिजे .रीड महाराष्ट्र सेलिब्रेटी डेज आजी आजोबा दिवस कैद्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश देणे ,चौदाखडी सराव गीत मंच समायदान खगोलशास्त्र लॅब बनविणे, आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चेंजिंग रूम तयार करणे या इतर उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती व त्यांची गुणवत्ता सुधारता येईल यावर आयुक्त अजिज शेख यांनी मार्गदर्शन केले जे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांकरता गरुड झेप या एप्लीकेशन बाबत उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी सांगितले व या ॲप्लिकेशन विषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी याकरिता आपण प्रयत्न करावे असे सांगितले तसेच शिक्षण विभाग मुख्य कार्यालयात हलविण्याच्या दृष्टिकोनातून काय कार्यवाही चालू आहे याबाबत विचारले असता येत्या महिना अखेर पर्यंत शिक्षण विभाग मुख्य कार्यालयात हलविले जाईल अशी माहिती मिळाली तसेच 18 नंबर शाळा व 24 नंबर शाळेच्या इमारतीच्या बांधकामा विषयी आढावा घेतला तसेच 29 नंबर शाळेमध्ये शिक्षकांसाठी एक मीडिया खोली तयार करावी असे त्यांनी सांगितले त्यामध्ये शिक्षकांनी बनवलेले ऑडिओ व्हिडिओज हे शिक्षकांना तयार करता येतील आणि त्याची रेकॉर्डिंग करता येईल या दृष्टिकोनातून हा विचार मांडण्यात आला होता. अशी माहिती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद