उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षण समावेशीत शिक्षण उपक्रम अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा
उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षण समावेशीत शिक्षण उपक्रम अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा उल्हासनगर : महानगरपालिका समग्र शिक्षण समावेशीत शिक्षण उपक्रम अंतर्गत आज दिनांक 18 मे 2023 रोजी महापालिका महासभा जीबी हॉल येथे अंगणवाडी सेविका शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी सामाजिक संस्था , सामाजिक संस्था यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होते. सदर कार्यक्रम माननीय आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख , अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणांनी घेण्यात आले .सदर कार्यक्रमांमध्ये माननीय उपायुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे ,उपायुक्त शिक्षण डॉ सुभाष जाधव, प्रशासनाधिकारी अशोक मोरे , जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे,क्रीडा अधिकारी शांताराम चौधरी , राजेश घनगाव दिव्यांग विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये मुख्य मार्गदर्शक जिल्हा परिषद ठाणे अनिल कुऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले. माननीय उपयुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे यांनी अंगणवाडी सेविका/ शिक्षक व कर्मचारी यांना प्रेरणादायक मार्गदर्शन केले व दिव्यांग यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केले. तसेच ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी दिव्यांग मुलांचे भविष्य करिता महापालिकेने जास्तीत जास्त कार्य करावे अशी विनंती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव भालेराव यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सौ. संगीता लहाने जिल्हा/मनपा समन्वयक समग्र शिक्षा यांनी केले. तसेच कार्यक्रमांमध्ये अमोल साबळे ,योगिता होलगीर,मनीषा पवार , हर्षदा नक्षीवाले यांनी सहकार्य केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद