पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शक्ती समाधान शिबिराचे आयोजन _
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शक्ती समाधान शिबिराचे आयोजन _ उल्हासनगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन दि. ३०/मे/२०२३ रोजी तहसीलदार कार्यालय उल्हासनगर कॅम्प नंबर ५ जिल्हा ठाणे येथे आयोजन करण्यात आले
.या शिबिराचे उद्घाटन उल्हासनगर विधानसभा आमदार कुमार आयलानी यांचे प्रतिनिधी श्रीमती मंगला चंदा यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) उल्हासनगर, सुवर्णा जाधव , प्रमुख अतिथी नायब तहसीलदार. अमित बनसोडे, नायब तहसीलदार गणपत शिंगाडे, (निवडणूक विभाग ), प्रमुख उपस्थिती आरोग्य अधिकारी डॉ.सतीश गंगावणे, अधिप्रचारिका,श्रीमती कविता वाघमारे, चव्हाण सर, शिधावाटप विभाग श्रीमती दिपाली पगारे,श्रीमती वैशाली दायगुदे, विवेक त्रिभवण, साळवे , समाज कल्याण विभागतील लोकेश कांबळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) उल्हासनगर कार्यालयाचे मुख्यासेविका श्रीमती विजया कुंभार, श्रीमती ज्योती सोनवणे, श्रीमती पवार मॅडम,श्रीमती मोहिते मॅडम, श्रीमती चौगुले मॅडम, श्रीमती केणी मॅडम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ठाणे कार्यालय अंतर्गत तालुका संरक्षण अधिकारी काशिनाथ साखरे, तहसीलदार कार्यालयाच्या संजय गांधी निराधार योजनेचे श्रीमती शिंदे इत्यादी अधिकारी /कर्मचारी यांनी शिबिरास भेट दिली व मार्गदर्शन केले. शिबिरास सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
या शिबिरात तालुक्यातील सर्व विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. उपस्थितांनी सर्व स्टॉलना भेट दिली व महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर समितीच्या सर्व सदस्य उपस्थित होते. महिलांनी या समितीसमोर आपल्या समस्या मांडल्या त्यातील काही समस्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या. त्याचबरोबर महिलांना सर्व विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. प्रास्तावीक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सुवर्णा जाधव यांनी केले. या शिबिराला सर्व विभागाचे कर्मचारी व मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद