सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे राजकुमार शर्मा यांचा दिल्लीमध्ये सत्कार

सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे राजकुमार शर्मा यांचा दिल्लीमध्ये सत्कार. उल्हासनगर : मधील नामांकित सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे उत्कृष्ट कामकाज असल्याने एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा  यांचा सत्कार दिल्ली एनसीआर मध्ये 30 एप्रिल 2023 रोजी प्योर इंडिया ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आला होता प्योर इंडिया ट्रस्ट च्या वतीने  प्योर सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड 2022 टॉप 10 या स्पर्धेचे आयोजन दिल्ली एनसीआर मध्ये करण्यात आले होते उल्हासनगर मधील सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा आणि त्यांची कन्या दिव्या शर्मा  यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तिसरा क्रमांक मिळविला व पन्नास हजार रुपये बक्षीस आणि ट्रॉफी व सर्टिफिकेट मिळविले उल्हासनगर मधील रहिवासी राजकुमार शर्मा हे आपल्या शहरात परतल्यावर शहरातील नागरिकांनी शर्मा यांचा सत्कार उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील स्वामी शांती प्रकाश वृद्धाश्रम तसेच जय बाबा धाम दरबार मध्ये आणि साईलख जीवन घोट गौशाळा या ठिकाणी अनेक मान्यवर यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन