पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, सभागृहात घोषणाबाजी


पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, सभागृहात घोषणाबाजी     मुंबई: शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवारांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही. 

"मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे," असं शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना म्हणाले. 

पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, सभागृहात घोषणाबाजी
दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर वाय बी सेंटरमध्ये उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यक्रत्यांना अश्रू देखील अनावर झाले. इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना निर्वूतीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.

शरद पवारांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती'  च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले.  पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवारांनी काय भाष्य केलंय, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तसंच, महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवारांनी नेमके कुठले किस्से सांगितले आहेत, याबद्दलही राजकीय रसिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, मुलगी सुप्रिया सुळे, एबीपी माझाआणि एबीपी न्युजचे संपादक राजीव खांडेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनचा सोहळा पार पडला. लोक माझे सांगाती पुस्तकातील नव्या आवृत्तीत 75  पानं वाढवण्यात आली  आहेत.  शरद पवारांच्या 2015 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार