अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबई केंद्रातून नाशिक शाखेची ‘अ डील’ एकांकिका सर्वोत्कृष्ट*

*अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबई केंद्रातून नाशिक शाखेची ‘अ डील’ एकांकिका सर्वोत्कृष्ट*
मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १० ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा येथे पार पडली. नाट्य परिषदेच्या सर्व शाखांसाठी हा उपक्रम गेल्या १३ वर्षांपासून सुरू आहे. मागील ४ वर्षांपासून हा उपक्रम बंद करण्यात आला होता. परंतु नवनिर्वाचित कार्यकारी समितीने या स्पर्धा पुन्हा सुरू केल्या आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी प्राथमिक फेऱ्या संपन्न झाल्या आहेत. मुंबई येथील प्राथमिक फेरी उद्घाटन प्रसंगी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ अभिनेत्री व कार्यकारी समिती सदस्या श्रीमती सविता मालपेकर, कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके, सहकार्यवाह श्री. दिलीप कोरके, बालरंगभूमीचे असिफ अन्सारी, परीक्षक श्रीमती रुपाली मोरे, श्री. अनंत जोशी, स्पर्धा प्रमुख श्री. शिवाजी शिंदे, श्री. दिगंबर आगाशे उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण ५ एकांकिका सादर झाल्या.
बोरिवली शाखेने सुरकुत्या, कल्याण शाखेने चफी, नाशिक शाखा - अ डील, मुलुंड शाखा नमस्कारासन तर मुंबई मध्यवर्तीने द स्टोरी ऑफ हिस् वर्ल्ड ही एकांकिका सादर केली.

स्पर्धेत वेगवेगळ्या विषयांवर एकांकिका सादर करण्यात आल्या.  या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी नाशिक शाखेची ‘अ डील’ ही एकांकिका सर्वोकृष्ट ठरली, तर मध्यवर्तीची ‘द स्टोरी ऑफ हिस वर्ल्ड’ ही एकांकिका उत्कृष्ट ठरली, आनंद जाधव यांना दिग्दर्शनाकरिता सर्वोत्कृष्ट तर सागर सातपुते यांना उत्कृष्ट पारितोषिक देण्यात आले. पूजा पुरकर, मानसी जाधव, हेमाली साळवे, स्नेहल काळे, करुणा कातखडे, विश्वंभर परेवाल, संकेत खंडागळे, कुणाल गायकवाड, नंदकिशोर भिंगारदिवे यांना अभिनयाची प्रमाणपत्र देऊन अभिनेते श्री जयवंत भालेकर, परीक्षक श्रीमती रुपाली मोरे व श्री अनंत जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धा प्रमुख श्री. शिवाजी शिंदे , कार्यालयीन कर्मचारी सचिन गुंजोटीकर, राहुल पवार, विशाल सदाफुले, व कार्यकर्ते श्री. गणेश तळेकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले अशी माहिती प्रमुख कार्यवाह श्री. अजित भुरे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार