अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखा तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त महिलांना साडी व मिठाई वाटप

 दिवाळीनिमित्त महिलांना साडी व मिठाई वाटप
अंबरनाथ मधील आंबेवाडी या आदिवासी पाड्यात अनेक गरजवंत महिला व बालके असून आंबेवाडी मध्ये कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा अंबरनाथ नगर परिषदेने केलेल्या नाहीत
अशी माहिती भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी जनहित न्यूज महाराष्ट्र ला दिली जनहित न्यूज महाराष्ट्राची टीम यांनी अंबरनाथ मधील आंबेवाडी या आदिवासी पाड्यात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी सुंदर डांगे यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे सर्व काही निदर्शनास आले होते

जनहित न्यूज च्या माध्यमातून आंबेवाडी ची बातमी जनहित न्यूज महाराष्ट्र चैनलवर प्रदर्शित करण्यात आली असता अनेक प्रेक्षकांनी बातमी पाहिली
जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेलची बातमी अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखेचे संबंधित अधिकारी यांना सुंदर डांगे यांनी दाखवली असता अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी यांनी तात्काळ सुंदर डांगे यांच्याशी चर्चा करून दिवाळीनिमित्त महिलांना साडी व मिठाई वाटप कार्यक्रम दिनांक १३ नोव्हेंबर 2023 रोजी अंबरनाथ येथील आंबेवाडी या ठिकाणी करण्यात आला
 यावेळी अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखेचे अनेक पदाधिकारी व कर्मचारी तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून आंबेवाडी परिसरातील महिला व बालके यांना मार्गदर्शन केले
परंतु अंबरनाथ नगर परिषदचे संबंधित अधिकारी यांनी  आंबेवाडीच्या आदिवासी नागरिकांची साधी दखल सुद्धा घेतली नाही असे स्थानिक महिलांनी माहिती दिली,तसेच अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर, यांनी सुद्धा आंबेवाडी परिसरातील नागरिकांची दखल घेतली नाही, ही मोठी आश्चर्याची बाब आहे
अंबरनाथ मधील काही प्रभागात अनेक वेळा कोट्यावधी रुपये निधी मिळवून देणारे अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किनीकर यांनी अंबरनाथ मधील आंबेवाडी या आदिवासी पाड्याकडे का दुर्लक्ष केले ? याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही,


आंबेवाडी आदिवासी पाड्यात लहान मुलांसाठी अंगणवाडी, बालवाडी, तसेच आरोग्य विषयक सुविधा मिळत नाहीत अशा अनेक समस्या या कडे कोणीही लक्ष दिले नाही 
येणाऱ्या काळात निवडणुका येतील त्यावेळी प्रचारासाठी किती उमेदवार अंबरनाथ मधील आंबेवाडी या ठिकाणी मत मागण्यासाठी फेऱ्या मारतील व आंबेवाडी परिसरातील नागरिकांची दुर्दशा पाहतील
तेव्हा तरी आंबेवाडी या आदिवासी पाड्याला न्याय मिळेल का हा मोठा प्रश्न आंबेवाडी च्या नागरीकांना पडला आहे
या वेळी पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर, समाजसेवक सलील जव्हेरी , प्राध्यापक धनराज डांगे सर पोलीस उपनिरीक्षक वाळू लबडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटोळे, पोलीस नाईक गणेश जाधव,  पोलीस शिपाई सलमान तडवी, महिला पोलीस शिपाई शोभा कणसे, महिला पोलीस शिपाई सोनाली माळी, वाहतूक मदतनीस सुशीलराव पोटघन, बाळाराम राणे,पप्पु अभागे , संगीता पतंगे, प्रमोद गायकवाड, हर्षद पठाडे समेत अनेक मान्यवर उपस्थित होते
जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेलचे संपादक हरी आल्हाट यांनी अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखेचे व भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या कौतुकस्पद कार्याबद्दल आभार व्यक्त केले


प्रतिनिधी:हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार