विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांना महापुरूषांचे योगदान समजावणे गरजेचे

विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांना महापुरूषांचे योगदान समजावणे गरजेचे

भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे यांचा सकल्प
अंबरनाथ: समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये निसर्गाने विशिष्ट कौशल्य जन्मजात दिलेले आहेत परंतु त्याचा पुरेपुर उपयोग शिक्षणामुळेच होऊ शकतो याची जाणीव ठेऊन शिक्षणासाठी पुढाकार घेणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी अंबरनाथ शहरातील आंबेवाडी या आदिवासी वस्तीवर भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली,

समाजासाठी आपले योगदान देणारे तसेच समाजात शिक्षणाची क्रांती घडवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी माहिती विचारताच विद्यार्थ्यांकडुन नकारार्थी मान हलवताच उपस्थिंताचे ह्रदय हेलावून गेले,

 स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना तळागाळातील लोकांपर्यंत त्याग व बलिदान देणारे समाजसेवक यांचे योगदान बिंबवण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत अशी खंत सुन्दर डांगे यांनी व्यक्त केली

भटके विमुक्त सामाजिक संस्था महापुरूषांच्या योगदानाबद्दल शाळास्तरावर व सामाजिक कार्यातून जनजागृती करेल असे आश्वासन भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे यांनी दिले.

आपल्याला आचार विचाराने घडविणारे महापुरुष हे आपले मार्गदर्शक आहेत, कितीही संकटं आली तरी न डगमगता तोंड देण्याचे सामर्थ्य या महापुरूषांमुळेच येतं त्याबद्दल आपण कृतज्ञ असलेच पाहिजे

 शिक्षक तसेच सुशिक्षित लोकानीं समाजातील लोकानां वेळोवेळी महापुरूषांच्या योगदानाचे महत्व पटवून दिले पाहिजे ही आपलीच जबाबदारी आहे असे ठाम प्रतिपादन सुंदर डांगे यांनी व्यक्त केले.

महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस हार घालुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली व लहान मुलांचे समुपदेशन करून खाऊ वाटप करण्यात आले,

 याप्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे नवि मुंबई अध्यक्ष सुरेश चव्हाण, जनहित न्यूज महाराष्ट्र चे उपसंपादक हर्षद पठाडे व इतर मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत