चिखलोली धरणातून अंबरनाथ पूर्व भागात होणारा पाणी पुरवठा सुरळीत सुरू करावा, तातडीने पावले उचलावी
चिखलोली धरणातून अंबरनाथ पूर्व भागात होणारा पाणी पुरवठा सुरळीत सुरू करावा, तातडीने पावले उचलावी अंबरनाथ प्रतिनिधी, नवरेनगर मधिल पाण्याची टाकी कमी वेळात पूर्ण क्षमतेने भरण्याकरिता चिखलोली जवळील लिकेज काढणे,7-8 फूट जमीनीखालील पाण्याची लाइन काढणे ऐवजी त्याठिकाणी ड्रॉप होणारा पाणी दाब पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ठिकाणी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम त्वरित हाती घेणे गरजेचे आहे, असे म.जी.प्रा. चे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांना भर रस्त्यात निकक्षून सांगितले. याबाबत अधिक्षक अभियंता तन्मय कांबळे व मुख्य अभियंता भामरे यांच्याशी फोनद्वारे सकारात्मक चर्चा केली. यावेळी शअधिकाऱ्यांना ठाण्याला बोलावून घेतले.याअगोदर माझ्या संवाद जनसंपर्क कार्यालयात वडवली विभागातील पाणीग्रस्त नागरिकांसोबत उपअभियंता बसंगर, शाखा अभियंता शेकोकारे यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभावी उपाययोजना करणे, पाणीपुरवठा तातडीने करणारी मुख्य लाईन टाकणं याकरीता कार्यकारी अभियंता देशपांडे यांना भेटण्याचे ठरल्यानुसार त्यांना एमआयडीसी पाईपलाईन रस्त्या लगत भेट घेतली, उपाययोजना करणेबाबत सविस्तर चर्चा केली. याबाबत अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांना माहिती दिल्यावर अधिक्षक अभियंता तन्मय कांबळे यांना फोन करुन सोमवार पासून चिखलोली धरणातून पाणीपुरवठा करणारी 500मी मी ची आवश्यक 200-300 मी. लांबीची नवीन जलवाहिनी तातडीने टाकण्यात यावी,असे निर्देश दिले. असल्याची माहिती माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी जनहित न्यूज महाराष्ट्रला lदिली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद