केंद्र सरकारचं दिवाळी गिफ्ट, ठाणे-कोल्हापूरसह १५ शहरांत PM ई-बस सेवा
कोल्हापूर : राज्यातील महापालिका क्षेत्रातील जनतेचा प्रवास नवीन वर्षापासून अतिशय सुखकर होणार आहे. यासाठी केंद्राने पीएम इ बस सेवा प्रकल्पा अंतर्गत तब्बल तेराशे वातानुकूलित बसेस मंजूर केल्या आहेत. दोन महिन्यात या बसेस महापालिका परिवहन समितीच्या ताफ्यात दाखल होतील. यामध्ये नागपूर, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यासह पंधरा शहरांचा समावेश आहे.
यासाठी केंद्राकडून तब्बल पाचशे कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करणार आहे. राज्यात बहुतांशी महापालिका क्षेत्रात सुरू असलेली परिवहन सेवा ही तोट्यात आहे. काही ठिकाणी बसेसची संख्या प्रचंड कमी आहे. ज्या आहेत, त्यांची स्थिती खराब आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेचा प्रवास सुखकर आणि गतीमान व्हावा, पर्यावरणाचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या विशेष समितीच्या वतीने पीएम इ बस सेवा प्रकल्प ही योजना राबविली. त्याअंतर्गत देशभरातील शहरात इ बस देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.देशभरातून आलेल्या प्रस्तावाबाबत केंद्र, राज्य व महापालिका अधिकाऱ्यांची या आठवड्यात बैठक झाली.
त्यानंतर गुरूवारी पुन्हा अंतिम चर्चा झाल्यानंतर देशभरातील शहरांसाठी तीन हजार १६२ बसेस मंजूर करण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल १२९० इतका आहे. देशात गुजरात, हरियाणा, जम्मू काश्मिर, ओडिसा आणि पंजाब अशा विविध राज्यांना या बसेस मिळणार आहेत.यातील प्रत्येक बसेसची किंमत चाळीस लाख रूपये आहे. दोन महिन्यात या बसेस त्या त्या शहरात दाखल होणार आहेत. त्यांची पार्किंग, चार्जिंग व इतर सुविधांची तयारी तोपर्यंत करण्याची मुदत आहे. नवीन वर्षात या बसेस दाखल होणार असल्याने नव्या वर्षात महाराष्ट्रातील पंधरा शहरातील प्रवास वातानुकूलित होणार आहे.
शहरे व मंजूर बसेस १५० बसेस : नागपूर, ठाणे, १०० बसेस : छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली नाशिक, विरार, भिवंडी, मिरा भाईंदर, कोल्हापूर, सोलापूर, उल्हासनगर५० बसेस : लातूर, अहमदनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद