DRUCC समिती बैठक
DRUCC समिती बैठक
DRUCC समिती बैठक वरिष्ठ विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल, यांच्या उपस्थितीत मध्य मुख्य कार्यालय,कॉन्फरन्स हॉल, मुंबई येथे पार पडली.
यावेळी DRUCC सदस्यांसह मध्य रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी अंबरनाथ रेल्वे स्टेशन व परिसराच्या भौतिक सोयी सुविधाबाबत सुभाष साळुंके यांनी दि.26/6/23 च्या बैठकीत मांडलेल्या मुद्दाबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक असून प्रशासकीय काम प्रगतीपथावर असल्याचे गोयल यांनी सांगितले.
अंबरनाथ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र.३,१ -२ वर लिफ्ट किंवा सरकते जिने तातडीने बसविणे बाबत आग्रही भूमिका मांडली. जेणेकरून लांब पल्ल्यासाठी प्रवाशी , बॅगा व सामान वाहतूक करणे इ.तसेच जेष्ठ नागरीक,महिला यांची अडचण दूर होईल. किमान लिफ्ट बसविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असे आश्वासन गोयल, यांनी दिले.
बी कॅबिन रोड लगतच्या नाल्याची खोली व रुंदीकरण करणे.,ज्यामुळे बी कॅबीन रोड परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही. याबाबत मी रेल्वे अभियंते,अंबरनाथ नगर परिषद अधिकारी व एमआयडीसी अभियंता यांच्यासह एकत्रित पाहणी दौरा केला होता, यामुळे वादाचे ,जागा मालकीचे मुद्दे सोडविल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले, याबाबत नाला व नवीन कल्व्हर्ट बांधणी करीता मध्य रेल्वे अधिकारी यांनी प्रस्ताव तयार केल्याने समाधान व्यक्त केले.
अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान पाणी निचरा होण्यासाठी रेल्वे ट्रॅक मध्ये असलेले जुने व अरूंद दगडी बांधकाम असलेले कल्वर्ट मोठे व रुंद करण्याबाबत मांडलेल्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत ३ व ४ मार्गिका काम करताना जुने अंडर पास मोठे केले जातील तसेच आवश्यक ठिकाणी अतिरिक्त कलव्हर्ट केले जातील, असे सांगितले.
अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरात व ट्रक वर पावसाचे पाणी साचणार नाही, याबाबत काम चालू आहे.
अंबरनाथ रेल्वे स्टेशन पूर्व - पश्चिम जोडणारा बदलापूर कडील नवीन 6मी.रुंदीचा पादचारी पूल (FOB) पुलाचे काम त्वरित सुरू करण्यात येईल.
बिस्कीट व चॉकलेट रॅपर इ.कचरा ट्रेन मध्ये न टाकता तो कचरा डब्ब्यात टाकण्यासाठी AC ट्रेन मध्ये निदान ३/४ ठिकाणी छोटे कचरा डब्बे ठेवण्यात यावेत, अशी सूचना सुभाष साळुंके यांनी केली.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद