कल्याण लोकसभेसाठी मनसे इच्छुक? आमदार राजू पाटील यांचे नाव चर्चेत

कल्याण लोकसभेसाठी मनसे इच्छुक? आमदार राजू पाटील यांचे नाव चर्चेत
कल्याण: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकऱ्यांबरोबर राज ठाकरे संवाद साधत आहेत. कल्याण येथे त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
कल्याण लोकसभेसाठी मनसे आमदार राजू पाटील यांच्या नावाची चर्चा काल पासून जास्तच रंगली आहे. दरम्यान दिवा, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ मधील पदाधिकारी यांची भेट राज ठाकरे घेणार आहेत.कल्याण लोकसभेत उमेदवार द्यायाचा की नाहीं याबाबत चर्चा होईल मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर आले आहेत. कल्याण लोकसभेसाठी महायुती, महाविकास आघाडी यांची परिस्थिती पाहून या मतदारसंघात मनसे म्हणून काय भूमिका घेता येऊ शकते, याची चाचपणी या दोन दिवसाच्या दौऱ्यात राज ठाकरे करणार आहेत.
ठाणे जिल्हातील ठाणे आणि भिवंडी लोकसभेला पेक्षा कल्याण लोकसभेवर राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येतं. राज डोंबिवली येणार असल्याने डोंबिवली मनसे शहर वतीने जागोजागी ठाकरे यांचे 20 फुटी कटआउटस लावले आहेत. तर मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहॆ. सकाळी डोंबिवली शहारात भव्य बाईकरैली काढण्यात आली.             लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी कल्याण येथील बैठकीत पदाधिकाऱ्यांना प्रश्न करत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी शहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष अशा मोजक्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली.
अनेक पदाधिकाऱ्यांनी या भागात मनसेचे वर्चस्व असून स्वतंत्र बाण्याने निवडणूक लढविण्याची मते व्यक्त केली. काहींनी अन्य पक्षाशी युती करून निवडणूक लढविली तर अधिक संख्या बळाने निवडून येऊ, असे स्पष्ट केले. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर तात्काळ मते व्यक्त केली नाहीत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आपल्या विभागातील पदाधिकाऱ्यांची माहिती लवकर जमा करा, त्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू असे राज यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. या बैठकीत मनसे नेते अविनाश अभ्यंकर, आमदार पाटील सहभागी झाले होते मनसे कार्यकर्त्यांच्या मनात आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभेची निवडणूक लढवावी, अशीच मते आहेत, असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, मला वाटतं उमेदवार कल्याण लोकसभे मध्ये असेल,

भिवंडी लोकसभेमध्ये असेल, उर्वरित महाराष्ट्रात असेल. आमच्या आमदाराची लोकप्रियता खूप आहे. आणि आमच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला वाटतं की राजू पाटील हे खासदार व्हावेत.

कार्यकर्त्यांची ती भावना आहे. निर्णय सन्माननीय राजसाहेब आणि राजू पाटील दोघे घेतील असे सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे आलेले आहेत
जनहित न्युज महाराष्ट्र
मुख्य संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार