शिवमय भजनसंध्या व शिवजन्मोत्सव सोहळा

शिवमय भजनसंध्या व शिवजन्मोत्सव सोहळा

मा.सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके आयोजित जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सव व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त

शिवमय भजनसंध्या व शिवजन्मोत्सव सोहळा

अंबरनाथ ( प्रतिनिधी ज्योती पवार )
दि.२७ मार्च रोजी पूर्व संध्येलाजगद्‌गुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सव व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त
शिवमय भजनसंध्या व शिवजन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला


यावेळी जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  किर्तनकार ह.भ.प.राम महाराज फणसे ,उद्योजक श्रीनिवास वाल्मिकी,केशव राव मोरे माजी नगरसेवक श्री परशूराम एगडे यांच्या हस्ते करण्यात आले

दिप महिला भजनी मंडळ, रामकृष्ण महिला भजन मंडळ,तसेच बाप्पा मोरया भजनी मंडळ यांनी शिवभजन व शिव गायन सादर केले

शिवकालीन वेशभुषा सहभागी मुलांना बक्षिसे देऊन कौतुक केले. संवाद फाउंडेशन व संवाद घे भरारी महीला टीम ने शिवकालीन वेशभूषेत शिव नृत्य सादर केले.

सौ. सुवर्णा साळुंके यांनी राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत शिवपाळणा गायन केले,
असा शिवजन्मोत्सव सोहळा अंबरनाथ मध्ये प्रयत्न भक्ती-शक्ती प्रतिष्ठान ने केला आहे हे यशस्वी आयोजनाचे दुसरे वर्ष असल्याचे श्री.सुभाष साळुंके यांनी सांगितले.

यावेळी भक्ती शक्ती चौक येथे शिवमय वातावरण निर्माण झाले होते. संत तुकाराम महाराज,छत्रपती शिवराय,राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयजयकारी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी महिलांची विशेष उपस्थीती होती.

भक्ती-शक्ती चौक, रायगड बिल्डींग समोर, वडवली विभाग,अंबरनाथ (पूर्व). या ठिकाणी समस्त शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

या कार्यक्रमाचे आयोजन
सुभाष नारायण साळुंके माजी नगरसेवक
व अध्यक्ष: भक्ती शक्ती प्रतिष्ठान तसेच
सौ.सुवर्णा सुभाष साळुंके
अध्यक्षा: संवाद फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार