छत्रपती संभाजी महाराज यांच्या महतीचे गायन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या महतीचे गायन जय शंभूराया
आनंदी वास्तू प्रोडक्शनच्या आनंद पिंपळकर यांचा पुढाकार

मुंबई: ( गणेश तळेकर)
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणाचा, बलिदानाचा दिवस महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातली शिवप्रेमी,धर्मप्रेमी, शंभूप्रेमी जनता कधीच विसरू शकणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळा मध्ये दिडशे लढाया यशस्वीरित्या जिंकल्या. छत्रपती संभाजी महाराजांचे पुण्यस्मरण म्हणून आनंदी वास्तु प्रोडक्शन निर्मित छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणारी व आर्ततेने केली गेलेली आरती नुकतीच प्रदर्शित झाली असून आनंद पिंपळकर यांच्या ‘आनंदी वास्तू’ या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही आरती पहायला मिळेल

जय शंभूराया’ या आरतीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या महतीचे गायन
 
या आरती गीताच्या चित्रीकरणाची सर्व जबाबदारी अगदी कमी कालावधीत दिग्दर्शक सुरज वामन यांनी पार पाडली असून अजय घाडगे यांनी सुंदर छायाचित्रण केलं, अक्षय पितळे व निनाद शिंदे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.  हे गीत सोनू म्युझिकचे मारुती चव्हाण यांनी लिहिले आहे. संगीत तेजस साळुंखे यांचे आहे तर संदीप रोकडे आणि दीक्षा वावळ यांच्या तडफदार आवाजामध्ये गायीले आहे  हे आरती गीत शब्दबद्ध केलंय शुभम कुलकर्णी यांनी तर आनंद पिंपळकर,प्रणव पिंपळकर, धनश्री कदम, रोहित इंजनवारे यांच्या प्रमुख भूमिका असून निर्माती आहे अश्विनी पिंपळकर.

आनंदी वास्तू या युट्युब चॅनलवर ‘जय शंभूराया’  हे आरती गीत आपल्याला पहाता येईल. अशी माहिती गणेश तळेकर यांनी दिलीसाप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राची सभासद नोंदणी सुरू आहे कृपया वाचकास विनंती आहे की आपली सभासद नोंदणी करून आम्हास सहकार्य करावे 
आपण नोंदणी केल्यानंतर आपला अंक आपण दिलेल्या पत्त्यावर मिळेल
आपली बातमी व जाहिरात प्रसिद्ध करण्या साठी आमचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करावा किंवा ९९६०५०४७२९ या नंबर वर संपर्क साधा 
मुख्य संपादक हरी आल्हाट 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार