अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तर्फे केंद्रप्रमुख गणेश तळेकर यांचा सत्कार

गणेश तळेकर यांचा अ. भा.म.नाटय परिषद तर्फे मुंबई केंद्रप्रमुख म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार 
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या *१००वे* वर्ष निमित्ताने "नाट्यजागर स्पर्धा" भरविण्यात आली , त्यात "नाट्यसंगीत पद" स्पर्धा घेण्यात आली, दिनांक : ६ मे २०२४ रोजी अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त श्री. शशी प्रभू, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज डाफळे, प्रसिद्ध सिने- नाटय विजय गोखले व सविता मालपेकर , परिक्षक - शारदा दादरकर, ज्ञानेश पेंढारकर, मधुवंती दांडेकर
यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

    अखिल भारतीय मराठी नाटय परिषद तर्फे " नाट्यजागर स्पर्धा - २०२४ " मध्ये मुंबई यशवंतराव नाटय संकुल , माटुंगा येथे माझा " मुंबई केंद्रप्रमुख म्ह्णून सन्मानचिन्ह " देऊन मान्यवर परिक्षक प्रसिद्ध मधुवंती दांडेकर , शारदा दादरकर ,ज्ञानेश पेंढारकर व प्रसिद्ध सिने-नाटय अभिनेत्री सविता मालपेकर, विजय गोखले यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.मला दिलेल्या या सन्मानाबद्दल मी अखिल भारतीय मराठी नाटय परिषद , पदाधिकारी , कर्मचारी , व सभासद व शिवाजी शिंदे यांचा खूप खूप आभारी आहे. - गणेश तळेकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार