भंडारी हायस्कूलची माजी विद्यार्थीनी असलेल्या हर्षदा हिचा मुंबई दादर येथील भंडारी कित्ते मंडळ हॉल येथे सत्कार
भंडारी हायस्कूलची माजी विद्यार्थीनी असलेल्या हर्षदा हिचा मुंबई दादर येथील भंडारी कित्ते मंडळ हॉल येथे सत्कार मुंबई:भारतीय सैन्यामार्फत घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील फायरिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून २४ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये मालवण मधील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची विद्यार्थिनी हर्षदा दादा पवार हिची निवड झाली आहे. आतापर्यंत बटालियन आणि ग्रुप मधून तीन राउंड यशस्वी पूर्ण करून चौथ्या राऊंडसाठी तिची निवड झाली आहे.
स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात
शिक्षण घेणाऱ्या हर्षदा पवार हीचे शालेय शिक्षण मालवणच्या भंडारी हायस्कूल मध्ये झाले असून तीन वर्षापूर्वी भंडारी हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असताना तिने राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज स्पर्धेत संघ निवडीच्या पात्रता फेरीसाठी तिची निवड झाली होती तर नेमबाज स्पर्धेत कु हर्षदा हिने यश मिळविल्याने भंडारी एज्युकेशन सोसायटी ( मालवण ) मुंबई यांनी भंडारी हायस्कूलची माजी विद्यार्थीनी असलेल्या हर्षदा हिचा मुंबई दादर येथील भंडारी कित्ते मंडळ हॉल येथे सत्कार करण्यात आला होता अशी माहिती मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर यांनी दिली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद