महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय ठाणे, सिमेंस वर्कर्स युनियन पुरस्कृत सिमेंस सांस्कृतीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनय स्पर्धा

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय ठाणे, सिमेंस वर्कर्स युनियन पुरस्कृत सिमेंस सांस्कृतीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनय स्पर्धा
मुंबई प्रतिनिधी- टी. गणेश
१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय ठाणे, सिमेंस वर्कर्स युनियन पुरस्कृत सिमेंस सांस्कृतीक संस्था  यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार कल्याण भवन, कन्नमवार नगर, विक्रोळी येथे एकपात्री अभिनय स्पर्धा
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी  सिमेंस वर्कर्स युनियनचे पदाधिकारी श्री.मनोज बोडके व श्री.राकेश मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी कॉम्रेड उदय महाले  आणि कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
सदर स्पर्धा ही ८ ते १६ वर्षे वयोगट व १६ वर्षांपुढील अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. ज्योती निसळ व श्री. गणेश तळेकर यांनी काम पाहिले. दोन्ही गटांमधून या स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन्ही गटातील स्पर्धकांनी कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे आपलं कौशल्य पणाला लावून या स्पर्धेची चुरस आणि रंगत वाढवली. छोट्या गटातील बालकलाकारांचं या वयातील अभिनय कौशल्य पाहून  प्रेक्षक थक्कच झाले. सादरीकरणाचे दमदार विषय आणि उत्कृष्ट सादरीकरण करत या सर्व कलाकारांनी परीक्षकांची तसेच प्रेक्षकांची व मान्यवर पाहुण्यांची मने जिंकली. तसेच या स्पर्धेत काही वरिष्ठ नागरिकांनी देखील तरुणांना लाजवेल अशा उत्साहात व आनंदाने सादरीकरण केले त्यातील *मंथरा* या विषयावरील सादरीकरण करणाऱ्या श्रीमती. सुवर्णा मादूसकर (वय वर्ष ७६) यांना मोठ्या गटातील उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण समाजसेविका दीपिका भोसले, मान्यवर परीक्षक, सिमेंस वर्कर्स युनियनचे पदाधिकारी श्री.मनोज बोडके, दिलीप डिचोलकर आणि महेश सावंत पटेल सर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे आहेत. छोटा गट
प्रथम क्रमांक : कुमारी ओवी येलवे. (दगड) 
द्वितीय क्रमांक : कुमारी सेशा हिंदलकर. (वडाळा ब्रिज) 
तृतीय क्रमांक : कुमारी अद्विका गोसावी. (अशक्य ते शक्य) 
उत्तेजनार्थ पारितोषिक १ : कुमारी हर्षिका वर्टेकर (द्रौपदी) 
उत्तेजनार्थ पारितोषिक २ : कुमारी स्वरा मेस्त्री. (मला जगायचंय आई) 
मोठा गट
प्रथम क्रमांक : ऐश्वर्या पाटील. (ट्रेनचा डब्बा) 
द्वितीय क्रमांक :  स्वाती शिवशरण (कोरोनातील ऑनलाइन शाळा) 
तृतीय क्रमांक : शंकर मनोहर सावंत. (तात्या मालवणी) 
उत्तेजनार्थ पारितोषिक १ : अक्षता साळवी. (दांडा) 
उत्तेजनार्थ पारितोषिक २ : सुवर्णा मादुसकर. (मंथरा) 
स्पर्धेनंतर माननीय परीक्षक सौ. ज्योती निसळ व सन्माननीय दीपिका भोसले यांनी सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन केले. शेवटी श्री.सतीश देसाई यांनी आभार प्रदर्शन करून स्पर्धेची सांगता केली. स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी  श्री महेश कापोडसकर , श्री लव श्रीरसागर , श्री. महेश सावंत पटेल सर आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे  मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच सिमेंस वर्कर्सचे कार्यकर्ते श्री.आनंद कडू, श्री.महेश शिखरे, श्री.राजेश सारंग,श्री.पी.कुमार  यांनी स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा