भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका शाखेचे वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न

भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका शाखेचे वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न 

(प्रतिनिधी:अशोक शिरसाट)
उल्हासनगर भारतीय बौध्द महासभा राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका आद मीराताई यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश  रावलिया, रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन अॕड सुभाष जोंधळे, कार्याध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर, यांच्या आदेशानुसार, राष्ट्रीय उपाध्यक्ष अॕड एस  के भंडारे सर, राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख अॕड एस एस वानखेडे सर, यांच्या मार्गदर्शनाखालील सोमवार दि ६ मे २०२४ रोजी उल्हासनगर - मध्ये सुभाष नगर पंचशील बुद्ध विहारात उल्हासनगर तालुका शाखेच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होत या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक व्हि जाधव होते तसेच या संवाद मेळाव्याचे उद्घाटन ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी यांच्या हस्ते झाले तसेच या मेळाव्यात ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सुर्यवंशी सर, सचिव कातीलाल  भडांगे गुरुजी,  आरतीताई  कांबळे,  यांनी मार्गदर्शन केले होते तसेच या कार्यक्रमात वंचितांच्या  रेखाताई, कुरवाडे, रेखाताई उबाळे, उज्जल महाले, प्रा प्रवीण साळवे, यांच्या २४ कल्याण लोकसभा मतदार संघातील उच्चविद्याविभूषित अधिकृत उमेदवार डॉ मोहम्मद शहाबुद्दीन शेख, यांनी या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात भेट देऊन भारतीय बौध्द महासभेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून चर्चा केली तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी सुध्दा बोलताना सांगितले की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ मोहम्मद शहाबुद्दीन शेख हे आपले उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे गॅस सिलिंडर आहे आणि या गॅस सिलिंडर यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन सुध्दा वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौध्द महासभा यांनी केले तसेच या कार्यक्रम प्रसंगी उल्हासनगर तालुका शाखेचे सरचिटणीस रोशन पगारे, कोषाध्यक्ष जीवन मोरे, उपाध्यक्ष अशोक एफ शिरसाट, प्रल्हाद पंडित, विजय कांबळे,  दिलीप शिंदे, भास्कर सरोदे, उल्हासनगर तालुका महिला अध्यक्षा कल्पनाताई वानखेडे, सरचिटणीस सुमनताई वाघ, यांच्यासह  उल्हासनगर तालुका शाखेचे पदाधिकारी, सर्व वार्ड शाखेचे पदाधिकारी आणि बौध्दाचार्य  ,  समता सैनिक दल यावेळी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार