महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे बेमुदत उपोषण रद्द

महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे बेमुदत उपोषण रद्द 

उल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने होणारे बेमुदत उपोषण आज रद्द करण्यात आले

दिनांक 15 जुलै 2024 रोजी उल्हासनगर महानगरपालिका गेट समोर कामगारांच्या मागण्या बाबत  बेमुदत उपोषण करण्यात येणार होते परंतु या उपोषणाला मनपा वरिष्ठ अधिकारी यांनी संघटनेला माहिती दिली सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे तसेच मोहरम सन आणि ठाणे जिल्ह्यातील पावसाचा वाढलेला जोर  यामुळे आपण या बेमुदत उपोषणाला स्थगिती आणावी आणि मनपाला सहकार्य करावे अशी माहिती दिली असता त्यांच्या विनंतीला मान देऊन संघटनेचे अध्यक्ष दिलीप सखाराम थोरात तसेच उपाध्यक्ष हरी चंदर आल्हाट यांनी आज होणारे बेमुदत उपोषण रद्द केले आहे परंतु येणाऱ्या काळात जर आमच्या मागण्या मंजूर न झाल्यास यापेक्षाही तीर्व  आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे तरी सर्व कर्मचारी यांना आज होणारे बेमुदत उपोषण रद्द झाले असल्याची माहिती देत आहोत आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास कर्मचाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की पुढील आंदोलनासाठी तयार राहावे अशी माहिती संघटना अध्यक्ष दिलीप थोरात यांनी दिली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन