13 ऑगस्ट ला घटना घडली मग पोलिसांनी कारवाई का केली नाही ? फडणवीस यांनी दिलं उत्तर
13 ऑगस्ट ला घटना घडली मग पोलिसांनी कारवाई का केली नाही ? फडणवीस यांनी दिलं उत्तर. बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेचे आज बदलापूर स्थानकावर पडसाद पाहण्यास मिळाले. ही घटना 13 ऑगस्टला घडली होती, तोपर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहे. बदलापूरच्या घटनेवर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ही घटना 13 ऑगस्टला घडली. आजपर्यंत कारवाई का झाली नाही, असा सवाल पत्रकारांनी विचारला.
त्यावर फडणवीस म्हणाले की, 'जेव्हा ही घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली होती. जाणीवपूर्वक कोणी दिरंगाई करत आहे का हे पाहिलं जाईल. पीडितेच्या कुटुंबियांना जाणीवपूर्वक त्रास दिला असेल तर त्याचीही चौकशी होईल. कुटुंबीयांना जाणीवपूर्वक पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं असेल, तर त्यावर कारवाई केली जाईल' असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.
'बदलापूरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. शाळेतील लहान मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केला आहे. ज्या प्रकारे त्याने अत्याचार केला आहे, ही घटना अत्यंत निंदनिय आहे आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे. अधिकारी आरती सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अंतर्गत ही चौकशी होईल. पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत चौकशी केली जाईल. तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री यांनीही सूचना दिल्या आहेत. तत्काळ चार्जशीट दाखल केली जाईल. फास्ट ट्रॅक कोर्टाचा अहवाल मागवला आहे. नराधमांना कुठेही पाठीशी घातल जाणार नाही. जी जी कारवाई केली जाईल ती वेगाने केली जात आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
बदलापूर स्थानकावर जो जमाव जमा झाला आहे,यावर बोलणे योग्य नाही. नराधमाला फाशी द्या, कायद्यानुसार जे करता येईल ते राज्य सरकार करेल. कुठेही दंगा होऊ नये पोलीस लक्ष देऊन आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
'सुप्रिया सुळेंच्या मनात निव्वळ राजकारण'
'असं आहे की, मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटत की विरोधी पक्ष यात राजकीय पोळी भाजत आहेत. यांच्या भावना बोथट आहेत. अशा घटना घडतात त्यावर निव्वळ राजकारण यांच्या मनात आहे. ते आता समोर येत आहे, असं म्हणत फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या राजीनामाच्या मागणीवर टीका केली.
शाळेवरच संस्थापक हा भाजपचा पदाधिकारी होता. सत्ताधाऱ्यांशी संबंधीत आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता,
फडणवीस म्हणाले की, 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले होते. त्यांच्या सारख्या व्यक्तीने असं वागणं त्यांना शोभत नाही. त्यांनी असं राजकारण करण योग्य नाही. मोठ्या नेत्यांनी जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी धीर द्यायचं असतो. अशा वेळी राजकारण करायचं नसतं. लोकांना न्याय द्यायचा असतो. उद्धव ठाकरे असो, सुप्रिया सुळे असो, त्यांना फक्त राजकारण करत आहेत. मी आणि मुख्यमंत्री सगळ्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो आहोत', अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद