लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले.

लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले.                                           
राज्य सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कंबर कसली आहे.    

लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज केल्याचे वृत्त समोर आले. बोगस लाभार्थ्यांनी योजनेत घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले. लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज भरले आणि त्यातील एकाच्या तर खात्यात 78 हजार रुपयांच्या घरात हप्ता सुद्धा जमा झाल्याचा प्रकार उघड झाला.                               

त्यामुळे आता राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. राज्य सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कंबर कसली आहे. त्यामुळे ज्यांनी या योजनेसाठी काही कारनामे केले असतील तर ते उघड होण्याची शक्यता आहे. काय घेतला सरकारने मोठा निर्णय?

आता होणार गुन्हे दाखल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याच्या प्रकरण ला आळा घालण्यासाठी आता अर्जांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. तर बोगस अर्ज आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा ही देण्यात आला आहेय लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटण्याच्या प्रकारानंतर महिला आणि बालविकास विभाग आता खडबडून जागे झाले आहे. यापुढे अर्जांची सखोल छाननी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

काय घडला प्रकार

अकोल्यामध्ये एका पुरुषाने लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचा प्रकार उघड झाला होता. अर्ज छानणी करताना हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर हा अर्ज बाद करण्यात आला. पण त्याहून मोठा कारनामा साताऱ्यातील एका व्यक्तीने केला. त्याने या योजनेत जवळपास 30 अर्ज महिला म्हणून जमा केले. त्यासाठी त्याने महिलेच्या वेशात विविध छायाचित्र काढले. काही महिलांचे आधार कार्ड मिळवून त्या आधारे त्याने या योजनेत 30 अर्ज दाखल केले.

खारघर येथील पूजा महामुनी (27) यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया केली. पण प्रत्येकवेळी त्यांचा अर्ज नामंजूर होत होता. प्रशासनाने महामुनी यांना त्यांच्या नावावर योजनेचा हप्ता जमा झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी अर्जच नामंजूर झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर प्रशासनाने चौकशी केली. आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांक शोधून काढला. त्यावेळी साताऱ्यातील एका माणसाने या योजनेचा फायदा उचलल्याचे समोर आले होते. त्याच्या सहकारी बँकेतील खात्यात ही रक्कम जमा झाली होती.
.        नियमित वाचा साप्ताहिक बातमी जनहित 

जनहित न्युज महाराष्ट्र चैनल वर आपल्या बातम्या व जाहिराती प्रकाशित व प्रसिद्ध करण्याकरिता संपर्क साधा
.      मुख्य संपादक हरी आल्हाट 9960504729.                              
                           महत्त्वाची सूचना 
                      ____________________
साप्ताहिक वृत्तपत्र बातमी जनहित आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया न्यूज चैनल जनहित न्यूज महाराष्ट्र मध्ये प्रकाशित व प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व जाहिराती.सामाजिक.मनोरंजक आणि राजकीय तसेच गुन्हे या संदर्भातील बातम्या प्रेस नोट वर आधारित असून सदर काही बातम्या जिल्ह्यातील प्रतिनिधी यांनी पाठविलेल्या असतात बातमीमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्वरित मुख्य संपादक यांच्याशी संपर्क साधावा तसेच चॅनलवर मुलाखत घेत असताना प्रतिनिधीला सदरील मुलाखत देणाऱ्या व्यक्तीने मुलाखत देताना काही अपवाद ग्रस्त असलेल्या शब्दांचा वापर केला असेल तर त्या शब्दाला जनहित न्युज महाराष्ट्र.साप्ताहिक बातमी जनहित किंवा प्रतिनिधी जबाबदार नसणार. अपवादग्रस्त शब्दांचा वापर करणारा मुलाखत.          ( बाईट ) देणारा व्यक्तीच  जबाबदार असेल याची नोंद घ्यावी 
संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार