जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघातील काही जागा मिळाव्यात अशी केली मागणी
जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघातील काही जागा मिळाव्यात अशी मागणी
मुंबई : दिनांक 20 ऑक्टोंबर 2024 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या व डेमोक्रॅटिक पार्टी आफ इंडियाचे सुकुमार कांबळे आणि अजिंक्य चांदणे यांच्या उपस्थितीत जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव आल्हाट यांच्या जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघातील जागा मागण्यात आल्या आहेत
जनहित लोकशाही पार्टीने 2014 व 2019 लोकसभाच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र मध्ये जनहित लोकशाही पक्षाने जाहीर पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने सहभागी होऊन पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणले होते
याही वेळी सुद्धा जनहित लोकशाही पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचं ठरवलेलं आहे परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काही जागा जनहित लोकशाही पक्षाला मिळाव्यात अशी मागणी सुद्धा केली आहे
यावेळी जनहित पक्षाला विधानसभेच्या जागा देण्याची मागणी ही महत्त्वाची आहे त्या जागा मिळाव्यात जेणेकरून मागासलेल्या वर्गातील गरीब पिछडे अनुसूचित जातीच्या लोकांना याचा फायदा होईल
अशी मागणी जनहित लोकशाही पक्षाचे अशोकराव आल्हाट यांनी केली असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार म्हणाले की आम्ही आपल्या मागण्यांच्या बाबतीत योग्य भूमिका घेण्याचे काम करतो असे विधान शरदचंद्रजी पवार साहेब यांनी यावेळी केले
तसेच जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राव आल्हाट यांनी महाविकास आघाडी मध्ये सामील असणारे सर्व मुख्य नेत्यांना व सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून सकारात्मक चर्चा केली
तसेच अनुसूचित जाती मधील मातंग समाजाच्या लोकसंख्या प्रमाणे जागा दिल्या जाव्यात असे मागणी पत्र दिले तसेच अशोकराव आल्हाट यांनी मतदार संघातून काही महत्त्वाची नावे सुद्धा दिली आहेत
मातंग समाजाला आतापर्यंत कोणत्याही पक्षाने जास्त प्रमाणात जागा दिल्या नाही ही खंत आल्हाट यांनी व्यक्त केली
तसेच शिवसेना नेते नितीन राऊत यांना सुद्धा भेट देऊन मागणी पत्र दिले व मागणी पत्राच्या विषयावर चर्चा केली.. नियमित वाचा
साप्ताहिक बातमी जनहित जनतेचा आवाज
युट्युब वर बातमी पाहण्यासाठी सर्च करा जनहित न्यूज महाराष्ट्र आणि पहा आपल्या शहरातील बातम्या मोबाईलवर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद