भ्रष्टाचार जनअक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदन पत्र

भ्रष्टाचार जनअक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदन पत्र
विठ्ठल रुक्मणी पतपेढी कल्याण संस्थेने हरी आल्हाट यांच्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध सहकार मंत्री यांच्याकडे आल्हाट यांना न्याय मिळण्यासाठी केली मागणी                                                                  
विठ्ठल रुक्मिणी पतपेढी कल्याण संस्थेने हरी आल्हाट यांच्यावर  लादलेल्या अवाढव्य कर्जामुळे हरी आल्हाट यांची मनस्थिती बिकट झाली असून त्यांना न्याय मिळावा यासाठी भ्रष्टाचार जन आक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी यांनी उल्हासनगर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निवेदन पत्र देऊन सहकार मंत्री मंत्रालय मुंबई यांच्याकडे मागणी केली आहे
निवेदन पत्रात लिहिले आहे की  हरि चंदर आल्हाट यांच्यावर  विठ्ठल रुक्मणी पतपेढीकडून होत असलेल्या अन्याय बाबत यांनी सहकार मंत्री तसेच संबंधित अधिकारी यांनी लवकरच विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण या संस्थेची चौकशी करून हरि आल्हाट यांना न्याय मिळवून द्यावा

त्यांना जर न्याय नाही मिळाला तर ते आंदोलन करणार आहेत  त्या आंदोलनाला आमच्या संघटनेचा जाहीर पाठिंबा असून त्यांच्या समर्थनार्थ आम्ही सक्रिय सहभागी होऊन रस्त्यावर उतरू याची नोंद घेण्यात यावी

या वेळी भ्रष्टाचार जन आक्रोश संघटना महाराष्ट्र राज्याचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब साठे. लहुजी परिवर्तन सेना अध्यक्ष दीपक सोनोने. पत्रकार बाबू आढाव. संजय टाक. उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत